आता कृषी पंपाना मिळणार १६ तास वीज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2017 00:23 IST2017-03-04T00:23:47+5:302017-03-04T00:23:47+5:30
विविध कृषी संघटनानी शेतकऱ्यांना वीज ८ तास न देता त्याचा कालावधी वाढवावा यासाठी आंदोलने केली.

आता कृषी पंपाना मिळणार १६ तास वीज
बाळा काशिवार यांच्या प्रयत्नांना यश
साकोली/लाखनी : विविध कृषी संघटनानी शेतकऱ्यांना वीज ८ तास न देता त्याचा कालावधी वाढवावा यासाठी आंदोलने केली. लाखनी व साकोली येथे शेतकरी संघटनासमोर येऊन विजेचा पुरवठा वाढवावा यासाठी प्रयत्न केले. या सर्व आंदोलनकर्त्यांना आ.बाळा काशिवार यांनी आश्वासन दिले की विजेचा पुरवठा वाढवू शकलो नाही तर पदाचा राजीनामा देईन. त्याला अनुसरुन त्यांनी शासन दरबारी मागणी रेटून लावली. शेवटी त्यांच्या प्रयत्नांना यश आले. आता १६ तास वीज मिळणार असून उन्हाळी पिक घेण्यास त्रास होणार नाही. आ.काशिवार यांच्या प्रयत्नांना यश आल्याने लाखनी येथे आ.काशिवार यांचे तहसिल कार्यालय चौकात स्वागत करण्यात आले. याप्रसंगी बाजार समितीचे सभापती शिवराम गिऱ्हेपुंजे, खरेदी विक्रीचे सभापती घनश्याम खेडीकर, उपसभापती धोंडू वंजारी, भाजपा तालुकाध्यक्ष पद्माकर बावणकर, निरज मेश्राम, पप्पू बावनकुळे, वाल्मिक लांजेवार, शेषराव वंजारी, सत्यवान वंजारी, ज्योती निखाडे, रजनी पडोळे, सिंधु बेलखोडे, हरिदास पडोळे याशिवाय असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)