शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

कृषी अधिकारी म्हणतात, धानपीक समाधानकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 9:22 PM

मंडळ कृषी कार्यालय सिहोरा अंतर्गत येणाऱ्या ७३ गावांच्या शेत शिवारात लागवड करण्यात आलेले धानाचे पिक समाधानकारक असल्याची पावती मंडळ कृषी अधिकारी एस.जी. उईके यांनी दिले आह. पंरतू करपा, तुडतुडा रोगांचे प्रमाण अल्प असल्याचे नाकारले नाही.

ठळक मुद्देकरपा, तुडतुडा रोगांचे प्रमाण अल्प : १४ हजार हेक्टर जागेत धानाची लागवड

रंजीत चिंचखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : मंडळ कृषी कार्यालय सिहोरा अंतर्गत येणाऱ्या ७३ गावांच्या शेत शिवारात लागवड करण्यात आलेले धानाचे पिक समाधानकारक असल्याची पावती मंडळ कृषी अधिकारी एस.जी. उईके यांनी दिले आह. पंरतू करपा, तुडतुडा रोगांचे प्रमाण अल्प असल्याचे नाकारले नाही.सिहोरा स्थित असणाºया मंडळ कृषी कार्यालयाला तुमसर तालुक्यातील ७३ गावांचा प्रशासकीय कारभार जोडण्यात आलेला आहे. सिंचन क्षेत्र आणि विस्तारित क्षेत्र मोठे असले तरी यंत्रणा शेतकºयांचे बांधावर पोहचत आहे. या कार्यालय अंतर्गत यंदा १४ हजार हेक्टर आर शेतशिवारात धान पिकांची लागवड करण्यात आली आहे. आॅक्टोबर महिन्यात धान पिकाची विशेष काळजी घेण्याचे प्रयत्न शेतकरी करित आहे.या महिन्यात धानाचे पीक गर्भावस्थेत असल्याने औषधाची फवारणी करिता शेतकºयांचा वाढता कल आहे. धानाचे पिकांना रोगांची लागण आधीच अतिरिक्त औषधचे फवारणी करण्यात येत आहे. यंदा कृषी विभागाचे पथकाने ७३ गावांतील शेतशिवारात धान पिकांची पाहणी केली आहे. या पाहणीत धानाचे पीक समाधानकारक असल्याचे दिसून आले आहे. काही शेतशिवारात करपा आणि तुडतुडा रोगाने हजेरी लावल्याचे दिसून आले आहे.या रोगांचे प्रमाण ५ टक्के असल्याची माहिती कृषी कार्यालयाने दिली आहे. धानाचे पिकांना सुरक्षीत व रोगमुक्त करण्यासाठी हॉय डोज औषधाची फवारणी विना मार्गदर्शनाने शेतकरी करित असल्याने, धानाचे पिकांना नुकसान होत आहे. औषधाची फवारणी करताना कृषी विभागाने गाईड लाईन पत्रक तयार केली आहे. या मार्गदर्शण पत्रात चार गटात विभागणी करण्यात आली आहे. शेतकरी यांना नियोजित आणि वेळेवर मार्गदशृन करण्यासाठी कृषी सहायकांचे पथक तयार करण्यात आले आहे.तुमसर तालुक्यात विस्तारीत क्षेत्रफळाने सिहोराचे मंडळ कृषी कार्यालय मोठे असून व्याप अधिक आहे. यामुळे अल्प कर्मचारी कार्यरत असताना शेतकºयांचे मदतीकरिता पथकाचे नियोजन करण्यात आली आहेत. सध्या स्थितीत धानाचे पिकांची अवस्था समाधानकारक असली तरी उर्वरित कालावधीत धान पिकाचे बाबतीत सावध राहण्याचे मार्गदर्शन शेतकºयांना कृषी विभागाचे करित आहेत. सिहोरा परिसरातील ४७ गावाचे शेत शिवारात चांदपूर जलाशयाचे पाणी सोडण्यात आले आहे. पावसाडा अल्प झाला असताना सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाने जलाशयाला तारले आहे. आमदार चरण वाघमारे यांचे प्रयत्नाने प्रकल्प स्थळात निरंतर वीज पुरवठा सुरू आहे. त्यांचे प्रयतनामुळेच रब्बी हंगामात उन्हाळी धान पिकांना वाढीव क्षेत्रात पाणी वाटपाचे मार्ग मोकळा झाला आहे. धान पिकांची स्थिती समाधानकारक आहे. ज्या शेतशिवारात दलदलचे प्रमाण अधिक आहे अशा भागातील पिकांवर करपाचे प्रमाण आहे. परंतु सर्वच शिवारात अशी परिस्थिती नाही. यामुळे शेतकºयांचे योग्य मार्गदर्शनासाठी असणाºया मंडळ कृषी कार्यालयात संपर्कात राहण्याची आवश्यकता आहे.सध्या स्थित धानाचे पीक समाधानकारक असून करपा व तुडतुडा रोगाचे प्रमाण अल्प आहे. शेतकºयांनी मार्गदर्शन घेतले पाहिजे. औषधांची फवारणी करताना सावधपणा ठेवण्याची आवश्यकता आहे.-एस.जी. उईके,मंडळ कृषी अधिकारी सिहोरा.