अग्नीशमन वाहन कुलूप बंदच!

By Admin | Updated: February 20, 2017 00:15 IST2017-02-20T00:15:56+5:302017-02-20T00:15:56+5:30

दरवर्षी उन्हाळा सुरु झाली की, अग्नीतांडव सुरु होते. घरांना गोठ्यांना तनीस ढिगांना आग लागण्याचे प्रमाण उन्हाळ्यात अधिक असते.

AgniShaman vehicle lockup lock! | अग्नीशमन वाहन कुलूप बंदच!

अग्नीशमन वाहन कुलूप बंदच!

चाहुल उन्हाळ्याची : कारभार नगरपालिकेचा
अशोक पारधी पवनी
दरवर्षी उन्हाळा सुरु झाली की, अग्नीतांडव सुरु होते. घरांना गोठ्यांना तनीस ढिगांना आग लागण्याचे प्रमाण उन्हाळ्यात अधिक असते. घटना घडल्यानंतर प्रशासनाची तारांबळ उडते. लोकांच्या सहकार्याशिवाय आता विझविल्या जात नाही. असे असतांना देखील पालिकेकडे असलेले अग्नीशमन वाहन कुलूप बंदच आहे.
महाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियान अंतर्गत नगर पालिकेला पाच वर्षापूर्वी अग्निशमन वाहन देण्यात आले व कर्मचारी भरती संदर्भात शासनाकडून निर्देश देण्यात आले. सहायक अग्निशमन पर्यवेक्षक हे वर्ग ३ चे पद जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत भरावयाचे आहे. त्या पदाचे नियूक्ती संदर्भात पालीका प्रशासनाने कित्येकदा प्रयत्न केला परंतु जिल्हा प्रशासनाने पदाचे भरतीसंदर्भात अद्यापही निर्णय घेतलेला नाही. वाहन चालक कम आॅपरेटर हे वर्ग तीनचे पद जिल्हा निवड समितीमार्फत फरावयाचे होते. त्यासंदर्भात कोणतीच प्रक्रिया अजून झालेली नाही. फायरमन हे वर्ग ४ चे पद नगर पालिका सर्वसाधारण सभेच्या परवानगी ने भरावयाचे असे निर्देश देण्यात आलेले होते. परंतू गेल्या पाच वर्षात कर्मचारी कोणी व कसे भरायचे यावर विचारमंथन होत राहिले. २० लक्ष रुपये खर्च करुन घेतलेले वाहन ३० लक्षरुपये खर्चून बांधलेल्या गोडावून सारख्या इमारतीत बंद अवस्थेत पडून आहे. तत्कालीन पालिका पदाधिकाऱ्यांनी फायरमन हे वर्ग ४ चे पद सर्वसाधारण सभेच्या सहमतीने न भरता समिती नियूक्त केलेली होती. त्यावर देखील वादविवाद झाले व भरायेच तसेच बाकी राहिले. ‘जुने जाऊ दया भरणा लागुनी’ या उक्तीप्रमाणे पालिकेत सत्तातर झालेले आहे. पुर्वी शिवसेनेची एक हाती सत्ता होती, अडीच वर्षानंतर राष्ट्रवादीच्या मदतीने सेनेच्या नगरसेवक अध्यक्ष झाल्या. यावेळी नागरिकांनी सेनेला पुर्णत: नाकारले व नगर विकास आघाडीला सत्तेचा लाभ दिलेला आहे. राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षाच्या उमेदवारांना नाकारुन स्थानिक नेतृत्वावर विश्वास व्यक्त केलेला आहे. अग्निशमन वाहन बंद खोलीतून बोहर पडून संकटसमयी लोकांना कामात यावे, ही रास्त अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.

Web Title: AgniShaman vehicle lockup lock!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.