शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

तांत्रिक बिघाडानंतरही बसगाडी खेळाडूंना घेऊन झाली रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 6:00 AM

भंडारा येथे बस पोहचल्यावर खेळाडू व संघ व्यवस्थापक एस.आर. खोब्रागडे यांनी चालक व वाहकाचे कौतुक करण्यात आले. प्रवाशांच्या सोयीसाठी ब्रीदवाक्याचा प्रत्यय तुमसर आगार प्रमुख रामचौरे यांच्या निर्णयामुळे खेळाडूंना आला. सध्या तुमसर आगारात बसगाड्यांची कमतरता आहे. त्यामुळे प्रवाशी व विद्यार्थ्यांना उशीरा गंतव्य स्थानावर पोहचावे लागत आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । आगार प्रमुखांच्या निर्णयाने खेळाडू पोहचले वेळेवर, खेळाडूंनी मानले आगार प्रमुखांचे आभार

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : प्रवाशांच्या सेवेसाठी असे ब्रीदवाक्य एसटी महामंडळाचे आहे. परंतु शुक्रवारी तुमसर आगारात शालेय खेळाडूंच्या सेवेसाठी या ब्रीदवाक्याचा परिचय आला. सकाळी ९.३० च्या सुमारास भंडाराकडे जाणाऱ्या बसगाड्या नव्हत्या. खेळाडूंना तात्काळ भंडाराकडे जायचे होते. आगार प्रमुखांनी बसगाडीला जोखीम पत्करून भंडारा येथे खेळाडूंना घेऊन रवाना केली.शुक्रवारी भंडारा येथे जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा होती. तुमसर येथून १४, १७ व १९ वर्षीय मुलींचा संघ तुमसर बसस्थानकावरून भंडारा येथे जाण्यास आला. बसस्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी होती.सकाळी ९.३० च्या सुमारास भंडारा येथे जाण्यास बसगाडी उपलब्ध नव्हती. वेळ निघून जात होती. दरम्यान संघ व्यवस्थापकांनी आगार प्रमुख युधिष्ठीर रामचौरे यांचेशी संपर्क साधला.आगार प्रमुख रामचौरे तात्काळ कार्यालयातून बसस्थानकात दाखल झाले.त्यांनी तिरोडा-यवतमाळ येथे जाणारी बस काही तांत्रिक बिघाडाने बसस्थानकावर उभी होती. वाहक प्रशांत साठवणे व चालक पंकज पटले यांचेशी चर्चा केली. चालक व वाहकांनी भंडारा येथे जाण्यास होकार दिला.भंडारा येथे जाण्यापूर्वी आगार व्यवस्थापक रामचौरे यांनी तांत्रिक बिघाडाची माहिती संघ व्यवस्थापकांना दिली होती. इतर प्रवाशांनाही माहिती दिल्यावर त्यांनी प्रथम खेळाडूंना घेऊन जा असा समंजसपणा दाखविला.भंडारा येथे बस पोहचल्यावर खेळाडू व संघ व्यवस्थापक एस.आर. खोब्रागडे यांनी चालक व वाहकाचे कौतुक करण्यात आले.प्रवाशांच्या सोयीसाठी ब्रीदवाक्याचा प्रत्यय तुमसर आगार प्रमुख रामचौरे यांच्या निर्णयामुळे खेळाडूंना आला. सध्या तुमसर आगारात बसगाड्यांची कमतरता आहे. त्यामुळे प्रवाशी व विद्यार्थ्यांना उशीरा गंतव्य स्थानावर पोहचावे लागत आहे. शासनाने सदर समस्या दूर करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.

टॅग्स :state transportएसटी