रस्ता दुरुस्ती नंतर पुन्हा खड्डे पडण्याला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:31 IST2021-04-05T04:31:45+5:302021-04-05T04:31:45+5:30
आंतरराज्य मार्गावरील सुंदर टोला येथील प्रकार तुमसर : तुमसर कटंगी आंतर राज्य महामार्ग क्रमांक ३५६ येथील सुंदर टोला या ...

रस्ता दुरुस्ती नंतर पुन्हा खड्डे पडण्याला सुरुवात
आंतरराज्य मार्गावरील सुंदर टोला येथील प्रकार
तुमसर : तुमसर कटंगी आंतर राज्य महामार्ग क्रमांक ३५६ येथील सुंदर टोला या गावा शेजारी दोन ते तीन महिन्यापर्यंत पूर्वी रस्त्यावरील खड्डे दुरूस्ती करण्यात आले परंतु पुन्हा सदर रस्त्यावर खड्डे पडणे सुरू झाले आहे. येथील रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
तुमसर कटंगी आंतर राज्य महामार्ग वरील सुंदरटोला गावाजवळ रस्त्यावर खड्डे पडले होते सदर खड्डे संबंधित विभागाने दोन ते तीन महिन्यांपूर्वी बुज विले होते. पुन्हा या रस्त्यावर खड्डे पडणे सुरू झाले आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. खड्डे बुजवले नंतर दोन ते तीन महिन्यात खड्डे कसे पडले सुरू झाले असा प्रश्न उपस्थित होतो. रस्ता तयार करताना रस्त्याची गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
देव्हाडी तुमसर गोबर वाही नाका डोंगरी या मार्गावर रस्त्याचे रुंदीकरण मंजूर करण्यात आले होते. त्यापैकी देवाडी तुमसर गोबरवाही पासून दोन किलोमीटरच्या पूर्वी पर्यंत रस्ता बांधकाम करण्यात आले. त्यानंतर नाका डोंगरी पर्यंत अजून पर्यंत रस्ता पूर्ण झाला नाही. सदर सर्वे चे सदर रस्त्याचे सर्वे, अंदाजपत्रक पूर्ण तयार आहे परंतु उर्वरित रस्त्या करिता निधी नसल्याची माहिती आहे. पुढे हा रस्ता मध्य प्रदेशकडे जातो. लोकप्रतिनिधींनी येथे लक्ष देण्याची गरज आहे.