ऊर्जामंत्र्यांच्या दणक्यानंतर वीज विभाग सरसावले

By Admin | Updated: September 2, 2015 00:21 IST2015-09-02T00:21:57+5:302015-09-02T00:21:57+5:30

राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आढावा सभेत अधिकाऱ्यांना महिनाभराचा अल्टिमेटम दिल्यानंतर वीज ...

After the power minister, the power department has come out | ऊर्जामंत्र्यांच्या दणक्यानंतर वीज विभाग सरसावले

ऊर्जामंत्र्यांच्या दणक्यानंतर वीज विभाग सरसावले

तरीही तारांवर वेल : अनेक ठिकाणी डीपी उघड्याच
भंडारा : राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आढावा सभेत अधिकाऱ्यांना महिनाभराचा अल्टिमेटम दिल्यानंतर वीज वितरण विभागाचे अधिकारी तारांना तणावा देणे, रोहीत्रात तेल तपासणे, खांबावरचे वेल काढणे, तारा सरळ करणे आदी कामासाठी सरसावले आहे.
महिनाभरात भंडारा विभागात ११ केव्ही वीज वाहिन्यांच्या ३१७ तारांना तणावा दिला. वाकललेल्या ६६ खांबांना सरळ केले. ६१ रोहित्रात तेलाची मात्रा तपासून ती समतल केली. १४७ ठिकाणी इन्सुलेटर्स बदलविले तर १८४ ठिकाणी जंपर बदलविले आहेत. साकोली विभागात ११ केव्ही वीज वाहिन्यांच्या १४७ तारांना तणावा दिला. वाकललेल्या ११९ खांबांना सरळ केले. ३९ रोहित्रात तेलाची मात्रा तपासून ती समतल केली. ७६ ठिकाणी इन्सुलेटर्स बदलविले तर २१३ ठिकाणी जंपर बदलविले आहेत.
महावितरणच्या नागपूर परिमंडळाअंतर्गत येणाऱ्या भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली व वर्धा या पाचही जिल्ह्यात ही कामे करण्यात आली आहेत. पावसाळयात वीजपुरवठा सुरळीत राहावा यासाठी ही कामे करण्यात येत असली तरी अनेक ठिकाणी झाडाच्या फांद्या वाढल्याने ते कापण्याचे काम महावितरणकडून करण्यात येत आहे. याशिवाय जंगलेले खांब बदलविणे, उघड्या डी.पी.ना बंद करणे, त्यासभोवतालचा कचरा दूर करण्याचे कामेही सुरू आहेत. अशावेळेस अपघात टाळण्यासाठी काही वेळा वीज पुरवठा बंद ठेवावा लागत असल्यामुळे ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन वीज वितरण विभागाने केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: After the power minister, the power department has come out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.