लॉकडाऊननंतर अडकून पडलेल्या परराज्यातील मजुरांना पोहोचविण्यासाठी ३७४ चालकांनी बजावले कर्तव्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:35 IST2021-03-26T04:35:39+5:302021-03-26T04:35:39+5:30
बॉक्स चालक-वाहकांच्या कोरोना चाचणीत काही आले होते पॉझिटिव्ह मार्च महिन्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव झाल्याने एसटी महामंडळाने बसेस बंद ठेवण्याचा ...

लॉकडाऊननंतर अडकून पडलेल्या परराज्यातील मजुरांना पोहोचविण्यासाठी ३७४ चालकांनी बजावले कर्तव्य
बॉक्स
चालक-वाहकांच्या कोरोना चाचणीत काही आले होते पॉझिटिव्ह
मार्च महिन्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव झाल्याने एसटी महामंडळाने बसेस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर ऑगस्टपासून पुन्हा जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार एसटी बसेस सुरू झाल्या होत्या. त्यानंतर कर्तव्य बजावणाऱ्या चालक-वाहकांची एसटी महामंडळातर्फे आरोग्य विभागाच्या मदतीने कोरोना चाचणी करण्यात आली होती. यामध्ये काही चालक-वाहक पॉझिटिव्ह आले होते. मात्र त्यांच्यावर योग्य उपचार झाल्याने आज ते सुखरूप असल्याची माहिती आहे. त्यासोबतच आज प्रवाशांना बसस्थानकावर मास्क, सॅनिटायझर वापरण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
बॉक्स
कोरोनातील खरे कोरोनायोद्धे चालक-वाहकच
कोरोना संसर्ग पूर्णपणे कमी झालेला नव्हता तेव्हाही अनेक चालक-वाहकांनी आपली सेवा बजावली होती. त्यामुळे एसटीचे हे खरे कोरोनायोद्धे गौरवास पात्र आहेत. यासाठीच एसटीने चालक-वाहकांना प्रोत्साहन भत्ता देण्याचे जाहीर केले होते. अनेक राज्यात जाऊन मजुरांना पोहोचविण्याचे चालकांनी काम केले. रेल्वेने आपल्या मूळगावी मजुरांना जाण्यासाठी नागपूर, पुणे, भंडारा, गोंदिया रेल्वेस्थानक येथे या मजुरांना पोहोचवले. त्यामुळे अनेक महिने दूरवर अडकून पडलेल्या मजुरांना चालक-वाहकांच्या कर्तव्यामुळेच अखेर आपल्या घरी सुखरूप पोहोचता आले होते. याची जाणीव ठेवत अनेक मजुरांनी आपल्या गावी पोहोचल्यानंतर एसटीच्या या चालक-वाहकांची आरती करून गौरव केला होता, असेही काही चालकांनी सांगितले.
कोट
एसटी महामंडळाकडून परराज्यात मजुरांना सोडण्यासाठी कर्तव्य निभावलेल्या चालक-वाहकांना तीनशे रुपये प्रोत्साहन भत्ता जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार अनेक आगारांना ही रक्कम देण्यात आली आहे. यामध्ये भंडारा, साकोली, तिरोडा आगारातील अनेक चालक, वाहकांना हा प्रोत्साहन भत्ता देण्यात आला आहे. उर्वरित भत्ताही आल्यास वाटप केला जाईल.
डॉ. चंद्रकांत वडस्कर, विभागीय वाहतूक अधिकारी.
कोट
परराज्यात जाऊन मजुरांना पोहोचविण्याचे काम एसटीच्या चालकांनी केले आहे. चालकांचे कोरोनाकाळातील हे योगदान लक्षात घेऊन एसटी महामंडळाने चालक-वाहकांना तीनशे रुपये प्रोत्साहन भत्ता जाहीर केला होता. त्यानुसार चालक-वाहकांना कोरोना संसर्ग उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करीत एसटी विभागीय कार्यालयाने वेळोवेळी मनोधैर्य वाढवले.
-विजय गिदमारे, सहाय्यक वाहतूक निरीक्षक, भंडारा.