शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

‘रिलिव्ह आॅर्डर’नंतरही ‘त्या’ची प्रशिक्षणाकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 00:31 IST

मागील तीन दिवसांपासून ‘लोकमत’ने जिल्हा परिषदमधील एका विभागातील कर्मचाºयाचा ‘सेटिंग’ प्रकरणाची वृत्तमालिका प्रकाशित केली आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेतील सेटिंगप्रकरण : ‘तो’ कर्मचारी पळवाट शोधण्यात व्यस्त

प्रशांत देसाई।आॅनलाईन लोकमतभंडारा : मागील तीन दिवसांपासून ‘लोकमत’ने जिल्हा परिषदमधील एका विभागातील कर्मचाºयाचा ‘सेटिंग’ प्रकरणाची वृत्तमालिका प्रकाशित केली आहे. यात आता नवे प्रकरण उघडकीस आले आहे. ‘त्या’ कर्मचाºयाला विभागाच्या वतीने एका प्रशिक्षणासाठी शनिवारी रिलिव्ह केले. मात्र कर्मचाºयाने प्रशिक्षणाला पाठ दाखवून सोमवारला दिवसभर या प्रकरणातून वाचण्यासाठी पळवाटा शोधण्याचा प्रयत्न केला.‘त्या’ कर्मचाºयाबाबत ‘लोकमत’ने मागील तीन दिवसांपासून मालिका प्रकाशित केली आहे. याप्रकरणातून ‘तो’ कर्मचारी आरोग्य विभागातील असून तो या विभागात अधीक्षक म्हणून कार्यरत आहे. या कर्मचाºयाचे एक ना अनेक प्रकरण आता उघडकीस येवू लागले आहे. जिल्हा परिषदमधील चार कर्मचाºयांची कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी येथील एका प्रशिक्षणासाठी निवड झाली. जिल्हा परिषद प्रशासनाने यांना प्रशिक्षण घेवून आल्यानंतर त्याचा लाभ जिल्ह्यातील अन्य कर्मचाºयांना व्हावा यादृष्टीने ही निवड केली.या प्रशिक्षणासाठी आरोग्य विभागाचे पडारे नामक कर्मचाºयाला आरोग्य विभागाने २२ तारखेचे प्रशिक्षण असताना १८ नोव्हेंबरला (शनिवार) ‘रिलिव्ह आॅर्डर’ दिला. यानुसार राजन पडारे हे कार्यालयातून प्रशिक्षणासाठी कार्यमुक्त झाले असा विषय असताना त्यांनी प्रशिक्षणाला पाठ दाखवित दिवसभर कार्यालयातच कामकाज केले. दरम्यान त्यांनी एकीकडे रिलिव्ह आॅर्डर असतानाही त्यांनी शासकीय हजेरीचा रजिस्टरवर उपस्थितीची स्वाक्षरी केली. पडरे हे कार्यालयात उपस्थित असल्याने रिलिव्ह आॅर्डर देणाºया कर्मचाºयांसह उपस्थित सर्व कर्मचाºयांच्या भुवया उंचावल्या.दरम्यान ही बाब माहिती होताच प्रस्तुत प्रतिनिधीने सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास आरोग्य विभागाचे कार्यालय गाठून सहायक प्रशासन अधिकारी एम. डी. केवट यांची भेट घेतली.यावेळी त्यांना पडरे यांच्या प्रशिक्षणाबाबत माहिती जाणून घेतली असता ते गेलेच नसून कार्यालयातच उपस्थित असल्याचे व सोबतच त्यांनी उपस्थिती रजिस्टरवर स्वाक्षरी केल्याचेही गंभीर बाब त्यांनी सांगितली.याबाबत पडारे यांनी कुठल्याही प्रकारची लेखी स्पष्टीकरण कार्यालयाला दिले नसल्याचेही केवट यांनी ‘लोकमत’ला माहिती दिली. यावरुन पडारे यांनी कार्यालयाची दिशाभूल तर केली नाही ना अशी विचारणा केल्यावर भांबावलेल्या पडारे यांनी लागलीच संगणकावर स्पष्टीकरणाचे पत्र तयार करुन आवक -जावक रजिस्टर फाईलमध्ये ते ठेवून केवट यांच्याकडे ती फाईल सादर करण्याचा महाप्रताप केला. पडारे यांच्या चुका लपविण्याचा खटाटोप आरोग्य विभागातीलच काही अधिकारी करीत असल्याचा प्रकार या माध्यमातून उघडकीस आला आहे.आरोग्य विभागाची घाईकोल्हापूर जिल्ह्यात असलेले प्रशिक्षण हे बुधवारपासून सुरु होणार होते. त्याकरिता पडारे यांना सोमवारला रिलिव्ह करता आले असते. मात्र, आरोग्य विभागाने त्यांना शनिवारलाच रिलिव्ह केले. दरम्यान ‘लोकमत’ने वृत्तमालिका प्रकाशित केल्याने कदाचित याचा कारवाईला सामोरे जावे लागेल या भितीनेच त्यांनी प्रशिक्षणाला जाणे टाळले असावे अशी चर्चा आता जिल्हा परिषद वर्तुळात सुरु आहे.सीईओंनी दिले चौकशीचे आदेश?मागील तीन दिवसांपासून ‘लोकमत’ने जिल्हा परिषद मधील सेटींग प्रकरणाची मालिका लावली आहे. दोन प्रकरणात निलंबित झालेल्या कर्मचाºयाला पदोन्नती देण्यात आली. हा गंभीर प्रकार समोर आल्याने जिल्हा परिषद मुख्य कार्यपाल अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी यांनी चौकशीचे आदेश दिल्याची माहिती सुत्राने दिली. त्या गंभीर प्रकरणात जि.प.प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.प्रशिक्षणासाठी जाणे गरजेचे असल्याने राजन पडारे यांना शनिवारला रिलिव्ह करण्यात आले. मात्र प्रशिक्षणाला ते गेले नाही. त्याबाबत त्यांनी सायंकाळपर्यंत कार्यालयाला कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण सादर केले नाही. त्यांना कपाटाच्या चाव्या मागितल्या असता त्यांनी दिल्या नाही.-एम. डी. केवट, सहायक प्रशासन अधिकारी, आरोग्य विभाग, भंडारा