निवडणुकीनंतर ग्रामीण परिसर ठरले सत्तेचे केंद्र

By Admin | Updated: December 6, 2014 22:40 IST2014-12-06T22:40:40+5:302014-12-06T22:40:40+5:30

आतापर्यंतच्या कार्यकाळात कधी नव्हे इतका मतदारांनी शहरवासियांचा दारुन पराभव केला आहे. यावर्षात झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतदारांनी ग्रामीण क्षेत्रातील लोकप्रतिनिधींना

After the elections, the rural area became the center of power | निवडणुकीनंतर ग्रामीण परिसर ठरले सत्तेचे केंद्र

निवडणुकीनंतर ग्रामीण परिसर ठरले सत्तेचे केंद्र

भंडारा : आतापर्यंतच्या कार्यकाळात कधी नव्हे इतका मतदारांनी शहरवासियांचा दारुन पराभव केला आहे. यावर्षात झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतदारांनी ग्रामीण क्षेत्रातील लोकप्रतिनिधींना संधी दिली आहे. त्यामुळे पुढच्या पाच वर्षासाठी ग्रामिण परिसर भंडारा जिल्ह्याचे सत्ताकेंद्र बनले आहे.
एप्रिल महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत नाना पटोले निवडून आले. ते साकोली तालुक्यातील सुकळी येथील रहिवाशी आहेत. त्यामुळे भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे सत्ता केंद्र सुकळी ठरले आहे. त्यापूर्वी प्रफुल पटेल हे जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या गोंदियाचे रहिवाशी होते. त्यानंतर आॅक्टोबर महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत तुमसर विधानसभा क्षेत्रातून चरण वाघमारे हे निवडून आले.
तुमसरचे सत्ता केंद्र मोहाडी तालुक्यात
तुमसर क्षेत्रात येणाऱ्या मोहाडी तालुक्यातील कांद्री या गावाचे ते रहिवाशी आहेत. त्यांच्या विजयामुळे कांद्री हे गाव सत्ताकेंद्र ठरले आहे. निवडणुकीपासून ते तुमसरातही राहत आहेत. त्यापूर्वीचे आमदार अनिल बावनकर, मधुकर कुकडे, सुभाष कारेमोरे, केशवराव पारधी हे तुमसर शहरातील रहिवाशी आहेत.
भंडाऱ्याचे सत्ता केंद्र पवनीत
भंडारा विधानसभा क्षेत्रातून अ‍ॅड.रामचंद्र अवसरे हे निवडून आले. भंडारा क्षेत्रात येणाऱ्या पवनी या गावाचे ते रहिवाशी आहेत. त्यांच्या विजयामुळे पवनी हे गाव सत्ताकेंद्र बनले आहे. त्यापूर्वीचे आमदार नरेंद्र भोंडेकर, नाना पंचबुद्धे, रामभाऊ आस्वले हे भंडारा शहरातील रहिवाशी आहेत.
साकोलीची सत्ताकेंद्र ग्रामीण भागातच
साकोली विधानसभा क्षेत्रातून बाळा काशीवार हे निवडून आले. साकोली क्षेत्राचे आतापर्यंत सत्ताकेंद्र ग्रामिण भागातच राहिले आहे. तत्कालीन आमदार नाना पटोले हे सुकळी येथील रहिवाशी आहेत. त्यापूर्वीचे आमदार सेवक वाघाये हे लाखनी तालुक्यातील केसलवाडा येथील होते. त्यापूर्वीचे आमदार हेमकृष्ण कापगते हे मात्र साकोलीचे रहिवाशी आहेत. आता त्यांचे भाचे बाळा काशीवार हे सेंदूरवाफा येथील रहिवाशी आहेत. त्यांच्या विजयामुळे सेंदूरवाफा हे गाव सत्ताकेंद्र बनले आहे.
(जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: After the elections, the rural area became the center of power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.