आश्वासनानंतर उपोषणाची सांगता

By Admin | Updated: January 25, 2015 23:07 IST2015-01-25T23:07:53+5:302015-01-25T23:07:53+5:30

येथील ग्रामपंचायत शिपाई-चपराशी पदभरती प्रक्रिया वादात सापडली आहे. परिक्षार्थ्यांना परिक्षेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला. याप्रकरणातील दोषींवर चौकशीअंती कार्यवाही करण्यात यावी.

After the assurance, after the assertion of fasting | आश्वासनानंतर उपोषणाची सांगता

आश्वासनानंतर उपोषणाची सांगता

पालांदूर ग्रामपंचायतीतील प्रकार : चपराशी पदभरती प्रकरण
पालांदूर : येथील ग्रामपंचायत शिपाई-चपराशी पदभरती प्रक्रिया वादात सापडली आहे. परिक्षार्थ्यांना परिक्षेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला. याप्रकरणातील दोषींवर चौकशीअंती कार्यवाही करण्यात यावी. परिक्षा रद्द करुन नव्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या साक्षीने घेण्यात यावी. अश्या मागण्या घेऊन परिक्षार्थ्यांनी ग्राम पंचायतसमोर साखळी उपोषण शनिवारपासुन सुरु केले. याप्रकरणाची दखल घेत खंडविकास अधिकारी व चमू यांनी वेळ हवी असल्याने दि. ५ फेब्रुवारीपर्यंतचा वेळ मागून उपोषण सोडविला. उपोषणकर्त्यांनीही बाजू समजून घेऊन आणि सहमती दर्शवत निंबूपाणी पाजून उपोषणाची सांगता करण्यात आली.
उपोषणकर्ते व अधिकारी वर्ग यांच्यात शिष्टाई करुन प्रकरण शांतपणाने सोडविण्याकरिता जिल्हा परिषद सदस्य भरत खंडाईत, सेवा सह. सोसायटीचे अध्यक्ष दामाजी खंडाईत, प्रा. आनंदराव मदनकर, हेमराज कापसे, पोलिस पाटील रमेश कापसे, खंडविकास अधिकारी हेंमत मेहर, कृषी अधिकारी ए. के. जांभुळकर, विस्तार अधिकारी तथा चौकशीप्रमुख जी.पी. चकोले, ठाणेदार एच. एम. सय्यद, ग्रामविकास अधिकारी एच. एम. बावणकर, ग्रामपंचायत सदस्य, पत्रकार वर्ग व गावकरी उपस्थित होते. या प्रकरणाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. (वार्ताहर)

Web Title: After the assurance, after the assertion of fasting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.