अखेर खुटसावरीत पाणीपुरवठा सुरळीत
By Admin | Updated: June 5, 2016 00:24 IST2016-06-05T00:24:48+5:302016-06-05T00:24:48+5:30
तालुक्यातील खुटसावरी येथील नळधारकांना पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रात बिघाड आला. त्यामुळे गुरुवारपासून ग्रामस्थांना पाण्यासाठी धावपळ करावी लागली.

अखेर खुटसावरीत पाणीपुरवठा सुरळीत
दखल लोकमतची : सरपंच, सचिवांनी पाळला शब्द
भंडारा : तालुक्यातील खुटसावरी येथील नळधारकांना पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रात बिघाड आला. त्यामुळे गुरुवारपासून ग्रामस्थांना पाण्यासाठी धावपळ करावी लागली. याविषयी 'लोकमतने वृत्त प्रकाशित करताच दुरुस्तीचे काम युध्दस्तरावर करण्यात आले. अखेर शनिवारी खुटसावरीवासीयांना सुरळीत पाणीपुरवठा करण्यात आला.
गुरुवारला पाणीपुरवठा करणाऱ्या बोरवेलमध्ये बिघाड आल्यानंतर गावकऱ्यांना पाणीटंचाईचा त्रास होऊ नये, म्हणून सरपंच विजय वासनिक, ग्रामसेवक एस. एस. हातझाडे व नरेंद्र पोटवार यांनी वेळ न दवडता रात्रीला यंत्र तज्ज्ञांची चमूला आणण्यासाठी कसोसीने प्रयत्न केले. यंत्र दुरुस्त करणाऱ्या चमूने रात्री १० वाजतापासून कार्याला सुरुवात केली. बोरवेलमधील पाईप काढण्यासाठी तब्बल आठ तास लागले. ते कार्य पहाटेपर्यंत चालले. रात्री उशिरापर्यंत ग्रामस्थ तेथे उपस्थित होते. आज सकाळी नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात आला. पाणीपुरवठा सुरु झाल्यानंतर सरपंच व सचिवांनी शब्द पाळल्याची चर्चा गावात होती. गुरुवारला पाणीपुरवठा करणाऱ्या बोरवेलमध्ये बिघाड आला. त्यामुळे गावकऱ्यावंर पाणीटंचाईचा सामना करण्याची वेळ आली होती.
गावात सुस्थितीत असलेल्या एक-दोन हातपंपावर पाण्यासाठी महिलांची गर्दी वाढली होती. बोअरवेलवरील गर्दी पाहून अनेक नागरीक दोन, तीन किमी अंतरावर असलेल्या शेतातील स्रोतातून बैलबंडीने पाण्याची वाहतूक आज पहाटेपर्यंतही सुरु होती.
बोअरवेलमध्ये मोठा बिघाड असल्यामुळे दुरुस्तीसाठी पाच-सहा दिवस लागतील असा अंदाज गावात वर्तविण्यात येत होता. मात्र सरपंच व सचिवांनी प्रयत्नांची पराकाष्टा करून बोअरवेल दुरुस्ती करणाऱ्या चमूला विनंती केली. विनंतीवरून इतर कामे बाजूला सारून चमू खुटसावरीत रात्री ९ वाजता दाखल झाली. चमू दाखल होताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. बोअरवेलमध्ये पाईप जीर्ण असल्यामुळे चमूला ते काढण्यासाठी मोठे श्रम गाळावे लागले. (नगर प्रतिनिधी)