अखेर "त्या" अपघातातील शिक्षकाचा मृत्यू

By Admin | Updated: June 27, 2017 00:27 IST2017-06-27T00:27:47+5:302017-06-27T00:27:47+5:30

सस्थानकासमोरून लाखनी रोडकडून गोविंद कॉलनीत स्वगृही जात असताना चारचाकी स्वाराने ताराचंद गोंदोळे यांना धडक दिली. यात त्यांना जबर दुखापत झाली होती.

After all, "those" accidental death of a teacher | अखेर "त्या" अपघातातील शिक्षकाचा मृत्यू

अखेर "त्या" अपघातातील शिक्षकाचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर : बसस्थानकासमोरून लाखनी रोडकडून गोविंद कॉलनीत स्वगृही जात असताना चारचाकी स्वाराने ताराचंद गोंदोळे यांना धडक दिली. यात त्यांना जबर दुखापत झाली होती. त्यांच्यावर स्थानिक दवाखान्यात उपचार करून पुढील उपचाराकरीता नागपूर येथे हलविण्यात आले होते. १६ दिवसांनी उपचारादरम्यान त्यांचा सोमवार दुपारी ४ च्या सुमारास निधन झाले. ९ जुनच्या रात्री ८.३० वाजेदरम्यान शिक्षक ताराचंद गोंदोळे बसथानकातून लाखनी मार्गाहून घरी जात असताना टाटा सुमो क्रमांक एमएच ३१, डीसी २९०४ च्या चालकाने बेसावध सुसाट वेगाने गाडी चालवून त्यांना उडविले. यात त्यांच्या लहान मेंदूला जबर दुखापत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. १६ दिवस त्यांची मृत्युशी झुंज देत असतानाच त्यांची प्राणज्योत मालविली.

Web Title: After all, "those" accidental death of a teacher