अखेर कृषी कार्यालयाला सुगीचे दिवस
By Admin | Updated: August 5, 2015 00:49 IST2015-08-05T00:49:41+5:302015-08-05T00:49:41+5:30
सिहोरा येथील लघु पाठबंधारे विभागाच्या रिकाम्या वसाहतीच्या खोलीत हरदोली गावात असणाऱ्या मंडळ कृषी कार्यालयाचे स्थानांतरण होणार आहे.

अखेर कृषी कार्यालयाला सुगीचे दिवस
खोल्यांची रंगरंगोटी : चरण वाघमारे यांनी शब्द पाडला
चुल्हाड/सिहोरा : सिहोरा येथील लघु पाठबंधारे विभागाच्या रिकाम्या वसाहतीच्या खोलीत हरदोली गावात असणाऱ्या मंडळ कृषी कार्यालयाचे स्थानांतरण होणार आहे.
सिहोरा येथे गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत मंडळ कृषी कार्यालयाचे जागाअभावी पाच कि़मी. अंतरावरील हरदोली गावात स्थानांतरण करण्यात आले आहे. प्रमुख बाजारपेठ असणाऱ्या सिहोरा गावातून हक्काचा कार्यालय प्रशासकीय कार्यासाठी गावात पडविण्यात आल्याने शेतकऱ्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागला आहे. शेतकऱ्यांचे संबंधित कार्यालय सिहोरा गावात असताना मंडळ कृषी कार्यालय याच गावात स्थानांतरीत करण्यासाठी परिसरात ओरड सुरू झाली. परंतु कार्यालयाचे स्थानांतरण करताना दोन विभागाची आडकाठी ठरत होती. या आधी मंडळ कृषी कार्यालय जिल्हा परिषद अंतर्गत बांधकाम करण्यात आलेल्या बस स्थानक परिसरातील रिकाम्या प्रसस्त इमारतीत स्थानांतरण करण्याची योजना होती. हरदोली गावातील जीर्ण इमारती मधून प्रशासकीय कारभार होत असल्याने कार्यरत कर्मचारी भित भित सेवा देत होती. दरम्यान सिहोरा गावात लघु पाठबंधारे विभागात कर्मचाऱ्यांसाठी वसाहतीचे बांधकाम करण्यात आले आहे. बहुतांश कर्मचारी याच परिसरातील असल्याने कुणी या वसाहतीच्या खोल्यात वास्तव्य करीत नाही. ८-१० खोल्या उपयोगाविना पडून आहेत. या खोल्यात वीज, पाणी, शौचालय तथा अन्य सुविधा आहेत. या रिकाम्या खोल्या मंडळ कृषी कार्यालयाला प्रशासकीय कामकाजासाठी देण्याची विनंती आ. चरण वाघमारे यांना चुल्हाडचे माजी सरपंच भास्कर सोनेवाने, जेष्ठ शेतकरी गजानन निनावे, बालु तुरकर यांनी केले. कृषी आणि पाठबंधारे विभाग राज्य शासनाच्या अखत्यारित असल्याने रिकाम्या खोल्या शेतकऱ्यांच्या हितासाठी उपयोगात आणण्यास हरकत नाही, असे चित्र स्पष्ट होताच आ.वाघमारे यांनी जिल्हा स्तरावर वरिष्ठ अधिकारी यांचे सोबत बोलनी केली. या खोल्यात महसूल विभागाचे तलाठी, मंडळ अधिकारी कार्यालय स्थानांतरीत करण्याची ओरड होत आहे. सध्या हे कार्यालय ग्रामीण सचिवालयात असल्याने सरपंच, सचिव, संग्राम कक्ष, सचिवाचा प्रशासकीय कारभार करण्यात अडचण होत आहे. यामुळे तलाठी, मंडळ अधिकारी कार्यालय पाठबंधारे विभागाच्या रिकाम्या वसाहतीत गेल्यास शेतकऱ्यांना सोने पे सुहागा ठरणार आहे. एकाच व्यासपिठावर शेतकऱ्यांचे तीन विभाग उपलब्ध राहणार असल्याने राज्यातील पहिलेच उदाहरण ठरणार आहे. हे दोन्ही कार्यालय या वसाहतीत रिकाम्या खोल्यात स्थानांतरित करण्याचा प्रस्ताव आ. वाघमारे यांचे समस्त ठेवण्यात येणार आहे. (वार्ताहर)