शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

अखेर ‘तो’ मार्ग होणार मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2016 00:44 IST

परिसरातील भंगार व्यवसाय करणाऱ्यांनी मनमानी करून मिळेल त्या ठिकाणी ती भंगार ठेवल्यामुळे ग्रामस्थांना रहदारीला अडसर निर्माण झाला होता.

अड्याळ येथील प्रकरण भंगाराचे : पोलीस बंदोबस्तात होणार कारवाई अड्याळ : परिसरातील भंगार व्यवसाय करणाऱ्यांनी मनमानी करून मिळेल त्या ठिकाणी ती भंगार ठेवल्यामुळे ग्रामस्थांना रहदारीला अडसर निर्माण झाला होता. आता ग्रामपंचायतीने हा मुद्दा गांभीर्याने घेतल्याचे जाणवते. त्यामुळे सदर रस्ता रहदारीसाठी मोकळा होणार आहे. गेल्या सहा ते आठ वर्षापासून ज्या ग्रामस्थांनी ही कबाडी, हा व्यवसाय येथून हटविण्यात यावे, म्हणून कोर्टातही धाव घेतली होती. त्यानंतरही हा रस्ता अडवून धरल्यामुळे ग्रामस्थांना त्रास होतच राहिला. वृत्तपत्रात माहिती प्रकाशित होताच भंगार व्यवसाय करणारे रामदास दयाराम खोब्रागडे यांना ८ आॅगस्टपर्यंत रस्त्यावरील, नालीवरील जंगम मालमत्ता उचलण्यास सांगण्यात आले आहे. त्यानंतर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम ५३ अन्वये संपूर्ण साहित्य पोलीस संरक्षणात उचल करून जप्त करण्यात येणार असल्याचे पत्र ग्रामपंचायतीने सदर व्यवसायिकाला दिल्याची माहिती आहे.अड्याळ ग्रामपंचायतीने कागदावर आक्रमक भूमिका निभावली असली तरी त्याची अंमलबजावणी खरच होणार यात ही ग्रामस्थांना शंका असल्याची चर्चा आहे. कारण या आधी सुद्धा असे घडले. त्यामुळे शंका असल्याचे बोलले जात असले तरी यावेळी असे होणार नसल्याचेही ग्रामपंचायत कडून बोलल्या जात आहे. माहितीप्रमाणे वॉर्ड क्र. ३ येथील सार्वजनिक रस्त्यावर जलनिसारण गटारेवर व खुल्या जागेवर कबाडीचे निरूपयोगी साहित्य जंगम मालमत्ता ठेवले जाते त्यामुळे वाहतुकीस व येणाऱ्या जाणाऱ्यास त्यामुळे अडथळा ही होतो. निरूपयोगी साहित्य रस्त्यावर व नालीवर ठेवल्यामुळे पावसाचे पाणी साहित्यात साचल्यामुळे रोगांची लागण होऊ शकते. त्यामुळे व्यवसायीकाने तात्काळ सात आॅगस्टपर्यंत रस्त्यावरील, नालीवरील व खुल्या जागेवरील निरूपयोगी साहित्य व जंगम मालमत्ता उचल करावी अन्यथा महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम ५३ चाही उल्लेख करून खोब्रागडे यांना ग्रामपंचायतीने लेखी पत्रही पाठविले आहे. सहा ते आठ वर्षांपासून जे सहजासहजी हटले नाही ते एका ग्रामपंचायतीच्या अधिनियमाला पेलणार का,? असा प्रश्न उपस्थित होतो. याकडे अड्याळवासियांचे लक्ष ग्रामपंचायतीच्या कारवाहीकडे लागून आहे. (वार्ताहर)