अखेर उड्डाणपुलाच्या कामाला प्रारंभ

By Admin | Updated: January 7, 2015 22:48 IST2015-01-07T22:48:02+5:302015-01-07T22:48:02+5:30

गोंदिया-तुमसर-रामटेक राज्य महामार्गावरील तुमसर रोड रेल्वे क्रॉसिंग क्रमांक ५३२ वर उड्डाणपुलाच्या कामाला सुरूवात झाली आहे. राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित

After all, flyover work started | अखेर उड्डाणपुलाच्या कामाला प्रारंभ

अखेर उड्डाणपुलाच्या कामाला प्रारंभ

तुमसर : गोंदिया-तुमसर-रामटेक राज्य महामार्गावरील तुमसर रोड रेल्वे क्रॉसिंग क्रमांक ५३२ वर उड्डाणपुलाच्या कामाला सुरूवात झाली आहे. राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित हे बांधकाम होणार आहे. केंद्र व राज्य शासन येथे संयुक्तरित्या उड्डाणपूल तयार करीत आहे. ४० कोटींचा हा पूल असून अनेक वर्षांपासून प्रस्तावित होता.
तुमसर-गोंदिया-रामटेक राज्य महामार्गावर तुमसर रोड रेल्वे क्रॉसिंग क्रमांक ५३२ वर उड्डाणपूलाच्या कामाला सुरूवात झाली आहे. वाहतुकीला येथे प्रचंड अडथडा निर्माण होत असल्याने मागील १५ वर्षापासून उड्डाणपुल प्रस्तावित होता. रेल्वे व राज्य शासन येथे संयुक्तरित्या उड्डाणपूल तयार करीत आहे. ६० टक्के राज्य शासन तर १५ कोटी रेल्वे विभागाने येथे निधी मंजूर केला आहे.
राज्य शासनाने २५ कोटींची निविदा काढली. दोन्ही बाजूच्या अप्रोच रस्त्याचा त्यात समावेश असून रेल्वे ८० मीटरचे रेल्वे ट्रॅकवरील बांधकाम करणारे आहे. राज्य शसनाचे सार्वजनिक बांधकाम विभाग मोहाडीचे या कामावर देखरेख व नियंत्रण आहे. वनविभागाची येथे रितसर परवानगी प्राप्त झाली.
दोन्ही बाजूचा अप्रोच रस्ता ५००-५०० मीटरचा आहे. रेल्वेच्या बांधकामाची निविदा अजून निघाली नाही. या उड्डाणपूलाला किमान एक ते दीड वर्षे लागणार असल्याची माहिती आहे. या रेल्व ेक्रासींगवर २४ तासात ११० मालगाड्या तथा २० ते २२ प्रवाशी रेल्वे गाड्या धावतात.
२४ तासात सुमारे १३० ते १४० वेळा ही फाटक बंद होते. यामुळे फाटकाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागतात. वाहतुकीची प्रचंड कोंडी येथे निर्माण होऊन रुग्णांना त्रास सहन करावा, लागत आहे. अनेकदा वाहनाच्या फाटकाला धडक बसलेल्या असून रहदारी खोळंबल्याच्या घटना घडल्या आहेत. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: After all, flyover work started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.