अखेर अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांच्या याद्यांचे वाटप
By Admin | Updated: February 24, 2017 00:35 IST2017-02-24T00:35:19+5:302017-02-24T00:35:19+5:30
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांच्या याद्या युद्धस्तरावर पूर्ण करण्यात आल्या. आज मोहाडी तालुक्यातील

अखेर अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांच्या याद्यांचे वाटप
तातडीची सभा : दुकानदारांना याद्यांचे वितरण
मोहाडी : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांच्या याद्या युद्धस्तरावर पूर्ण करण्यात आल्या. आज मोहाडी तालुक्यातील सरकारी स्वस्त धान्य दुकानदारांना तातडीने तहसिलमध्ये बोलावण्यात आले. तातडीची सभा घेण्यात आली. सभेतच अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांच्या याद्या वाटप करण्यात आल्या. त्यामुळे आता दुकानात पोहचलेले धान्य लाभार्थ्यांपर्यंत जाण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या याद्या तयार झाल्या नाहीत. तथापि, लाभार्थी कोण याचा पत्ता नसताना इष्टांकानुसार सरकारी स्वस्त धान्य दुकानात गहू, तांदूळ पोहचले होते. त्या धान्याचे वाटप करण्याची अडचण होती. काल लोकमतमध्ये लाभार्थ्यांच्या याद्यांविना धान्य पोहचले दुकानात ही बातमी प्रकाशित झाली. प्रकाशित झालेल्या बातमीमुळे तहसिल कार्यालयातील प्रशासन एकच खळबळ निर्माण झाली. तीन महिन्यापासून याद्यांच्या प्रतिक्षेत असलेल्या धान्य दुकानदारांना गुरूवारी तहसिल कार्यालयात बोलावण्यात आले होते. त्या दुकानदारांची सभा तहसलिदार धनंजय देशमुख यांनी घेतली. सभेत अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांच्या याद्या वाटप करण्यात आल्या. तसेच तातडीने यादीतील लाभार्थ्यांना धान्याचे वाटप करण्यात यावे तसेच लाभ घेण्याऱ्या व्यक्तींच्या याद्यातील नावे अंतिम नाहीत. त्या याद्या ग्रामदक्षता समितीसमोर आणाव्यात. याद्यामध्ये चुकां होवू शकतात, असे प्रामाणिकपणे तहसिलदार धनंजय देशमुख यांनी सांगितले. आज १०६ स्वस्त धान्य दुकानदारांपैकी ६३ धान्य दुकानदारांना याद्यांचे वाटप करण्यात आले आहे. तसेच याद्या वाटपाची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले. बऱ्याच धान्य दुकानदारांपर्यंत सभेचा संदेश पोहचला नाही. बरेच धान्य दुकानदार सभेला पोहचले नव्हते. त्यामुळे त्या दुकानदारांना वैयक्तीकपणे मोबाईलवर संदेश देणे सुरू आहे. शक्य तेवढ्या लवकर धान्याचे वाटप करण्यात यावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच मार्च महिन्याचे धान्य पास करण्यात आल्याची माहिती आहे. आज ७३ धान्य दुकानदारांना याद्या प्राप्त झाल्या. त्या याद्यांमध्ये सधन व्यक्तीचे नाव आत सुरक्षा योजनेत समाविष्ट असल्याची माहिती मिळाली. यादीमधील त्या अपात्र व्यक्तीला लाभ दिला जाईल. गावात दूषित वातावरण तयार होण्याची शक्यता यामुळे बळावली आहे. धान्य दुकानदारांना देण्यात आलेल्या याद्या स्वस्त धान्य दुकान व ग्रामपंचायत येथे प्रसिद्ध करण्याची मागणी काहींनी केली आहे. याद्यांचे वाचन ग्रामसभेत झाल्यानंतर त्या याद्यांना अंतिम प्रारूप देण्यात यावे. याद्या पूर्णनिरीक्षण झाल्यानंतर याद्यांना अंतिम मान्यता दिली जावी. त्यावर पुन्हा तहसिलदार यांची स्वाक्षश्रीनिशी त्या याद्या स्वस्त धान्य दुकानदारांना पाठविण्यात याव्यात अशी मागणी आहे. याद्यामध्ये नक्कीच घोळ आहे अशी चर्चा बाहेर पडत आहे. (तालुका प्रतिनिधी)