अखेर नरभक्षक बिबट जेरबंद

By Admin | Updated: January 1, 2017 00:57 IST2017-01-01T00:57:04+5:302017-01-01T00:57:04+5:30

चिखलाबोडी येथे चार वर्षीय खुशी चराटे या बालिकेचा बळी घेतल्यानंतर संपूर्ण गावात वनविभागाविरूद्ध संताप निर्माण झाला होता.

After all, the cannibal beaver was martyred | अखेर नरभक्षक बिबट जेरबंद

अखेर नरभक्षक बिबट जेरबंद


रेंगेपार कोठा येथील पिंजऱ्यात अडकला : बिबटला पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी

लाखनी : चिखलाबोडी येथे चार वर्षीय खुशी चराटे या बालिकेचा बळी घेतल्यानंतर संपूर्ण गावात वनविभागाविरूद्ध संताप निर्माण झाला होता. संतप्त ग्रामस्थांनी चराटे कुटुंबीयांना आर्थिक मदत करा व बिबट्याला जेरबंद करा, तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही, अशी भूमिका घेतली होती. त्यानंतर वनविभागाने या बिबट्याला पकडण्यासाठी रेंगेपार (कोठा) येथे पिंजरा लावला होता. या पिंजऱ्यात हा बिबट रेंगेपार शनिवारच्या पहाटे अडकला.

चिखलाबोडी येथे आजीसोबत शेतात गेलेल्या खुशी चराटे या बालिकेला या बिबट्याने ठार केले होते. त्यानंतर वनकर्मचाऱ्याविरूद्ध ग्रामस्थांमध्ये संताप पसरला होता. शवविच्छेदनासाठी मृतदेह नेण्यासाठी विरोध केल्यामुळे पोलिसांना बंदोबस्त लावावा लागला होता. त्यानंतर खासदार नाना पटोले, आमदार बाळा काशीवार यांनी घटनास्थळाला भेट देऊन ग्रामस्थांचे म्हणने ऐकून घेतले. नरभक्षक बिबट्यास जेरबंद करा, चराटे कुटुंबीयाला शासकीय मदत द्या, मृत मुलीच्या वडिलाला शासकीय नोकरीत सामावून घ्या आणि दोन वनरक्षकांना निलंबित करा, अशी मागणी केली. त्यानंतर शासनाकडून एक लाख रूपये रोख व सात लाख रूपयाचा धनादेश त्या कुटुंबीयांना देण्यात आला. त्यानंतर जमाव शांत झाला. त्यानंतर या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने जंगल परिसरात विविध ठिकाणी पिंजरे लावले होते. अखेर दहाव्या दिवशी रेंगेपार (कोठा) परिसरात लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात हा बिबट पहाटेच्या सुमारास अडकला.

बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याचे वृत्त परिसरात धडकताच नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. त्यानंतर या बिबट्याला गडेगाव लाकूड आगारात नेण्यासाठी पोलीस ताफा बोलाविण्यात आला होता. पिंजऱ्यात अडकलेला बिबट हा तोच नरक्षभक आहे किंवा नाही हे मात्र कळलेले नाही. यावेळी उपवनसंरक्षक उमेश वर्मा, सहायक उपवनसंरक्षक मनोहर गोखले, उपविभागीय पोलीस अधिकारी मोहनदास संखे, पोलीस निरीक्षक चकाटे यांनी घटनास्थळाला भेट दिली. (तालुका प्रतिनिधी)



 

Web Title: After all, the cannibal beaver was martyred

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.