शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

४० वर्षानंतरही रामपुरी जलाशय दुर्लक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2020 5:00 AM

लाखनी तालुक्याच्या पूर्व टोकावर चुलबंध नदीखोऱ्यात वनव्याप्त दुर्गम भाग म्हणून मुरमाडी तुपकर परिसराची ख्याती आहे. अत्य, अत्यल्प शेतकरी आणि दारिद्र्यरेषेखाील कुटुंबातील संख्या अधिक असल्यामुळे मागास भूभाग अशी ओळख आहे. या शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी, याकरीता १०० हेक्टर साठवण क्षमता असलेल्या जलाशयाची पाटबंधारे विभागाकडून रोहयोच्या माध्यमातून ४५ वर्षापुर्वी रामपुरी जलाशय तयार करण्यात आले. पाळीची लांबी दीड किमी आहे.

ठळक मुद्देगेट, सांडवा, कालव्यांची कामे अपूर्ण : २५०० हेक्टर क्षेत्र सिंचनाच्या प्रतीक्षेत

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : लाखनी तालुक्यातील रामपुरी जलाशयाची १९७४ मध्ये रोजगार हमी योजनेंतर्गत निर्मिती आहे. जलाशयाच्या मालकीच्या संभ्रमातून पाटबंधारे विभागाने पाठ फिरविल्याने कालवा बांधकामासाठी खाजगी जमीन अधिग्रहित करून बांधकाम पुर्णत्वास नेले नाही. देखभाल दुरूस्तीअभावी गेट आणि सांडव्याची वाताहत झाली. त्यामुळे कोट्यवधी रूपये खर्च करूनही सिंचनाची सोय झालेली नाही. त्यामुळे नियोजित गावांमधील शेतकरी सिंचनाच्या प्रतीक्षेत आहे.लाखनी तालुक्याच्या पूर्व टोकावर चुलबंध नदीखोऱ्यात वनव्याप्त दुर्गम भाग म्हणून मुरमाडी तुपकर परिसराची ख्याती आहे. अत्य, अत्यल्प शेतकरी आणि दारिद्र्यरेषेखाील कुटुंबातील संख्या अधिक असल्यामुळे मागास भूभाग अशी ओळख आहे. या शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी, याकरीता १०० हेक्टर साठवण क्षमता असलेल्या जलाशयाची पाटबंधारे विभागाकडून रोहयोच्या माध्यमातून ४५ वर्षापुर्वी रामपुरी जलाशय तयार करण्यात आले. पाळीची लांबी दीड किमी आहे. तत्कालीन परिस्थितीनुरूप पाटबंधारे विभागाने नियोजन करून आवश्यक त्या ठिकाणी गेट आणि सांडव्याचे बांधकाम करण्यात आले. रामपूरी जलाशयापासून मुरमाडी तुप. परिसरातील रामपूरी, सोनमाळा, डोंगरगाव, मुरमाडी, झरप, कोलारा, दिघोरी, नान्होरी, कन्हाळगाव या गावातील २५०० हेक्टर शेतीला सिंचनाची सोय करण्यात येणार होती.पाटबंधारे विभागाच्या कालव्याच्या सर्वेक्षणानुसार शेतकºयांकडून शेतजमीन अधिग्रहीत करण्यात आली. मात्र काही भाग वनव्याप्त असल्यामुळे वनकायद्याचा अडसर तत्कालीन मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष यादवराव पडोळे यांच्या मार्फतीने दूर करण्यात आला होता.जलाशयावरील मालकीबाबत संभ्रमपाटबंधारे विभागाने १०० हेक्टर साठवण क्षमता असलेला जलाशय निर्माण केला असला तरी शासनाने २००८ च्या कायद्यान्वये ही क्षमता केलेले जलाशय जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाकडे हस्तांतरीत केले जाणार होते. मात्र ते करण्यात आले नाही. या जलाशयावर मालकी कुणाची हा संभ्रम असल्यामुळे आवश्यक सोयी-सुविधा निर्माण करण्यात अडचण होत आहे.विविध बांधकाम पूर्ण होणे गरजेचेरामपूरी जलाशयाची पाळ ४५ वर्षापूर्वी तयार करण्यात आली. त्यामुळे ठिकठिकाणी छिद्र पडून गळती लागल्याने पाणी वाहून जाते. देखभाल दुरूस्तीअभावी गेट व सांडवा नादुरूस्त आहे. नहराचे कामे अपूर्ण आहे. पाळीचे मजबुतीकरण, नवीन गेट आणि सांडवा तयार करणे तथा नहराचे बांधकाम पूर्ण होणे आवश्यक आहे. या सुविधा निर्माण झाल्यास मत्स्य व्यवसाय तथा शेतकºयांना सिंचनाचा लाभ मिळेल.

टॅग्स :water shortageपाणीकपात