१५ दिवसांच्या प्रयत्नानंतर अडकला ‘मगर’ जाळ्यात
By Admin | Updated: December 1, 2014 22:47 IST2014-12-01T22:47:44+5:302014-12-01T22:47:44+5:30
तालुक्यातील टेंभरी गावाजवळील वैनगंगा नदीपात्रातील एका मगराने चप्राड येथील तलावात १५ दिवसांपासून मुक्काम ठोकला होता. या मगराला पकडण्यासाठी वनविभागाचे कर्मचारीही दिवसरात्र एक करित होते.

१५ दिवसांच्या प्रयत्नानंतर अडकला ‘मगर’ जाळ्यात
टेंभरी येथील घटना : वनधिकाऱ्यांनी सोडला सुटकेचा नि:श्वास
लाखांदूर : तालुक्यातील टेंभरी गावाजवळील वैनगंगा नदीपात्रातील एका मगराने चप्राड येथील तलावात १५ दिवसांपासून मुक्काम ठोकला होता. या मगराला पकडण्यासाठी वनविभागाचे कर्मचारीही दिवसरात्र एक करित होते. दरम्यान आज सायंकाळच्या सुमारास या मगराला पकडण्यास वनविभागाला यश आले. लगेच त्याला सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले.
टेंभरी नदीघाटावर मगर दिसल्याने वन विभागाने त्याला पकडण्याचे प्रयत्न केले होते. मात्र त्यावेळी अपयश आले. काही दिवसांनतर पुन्हा तोच मगर चप्राड गावालगत असलेल्या तलावात आढळल्याने गावकऱ्यात भिती निर्माण झाली. तलावात असलेल्या मासोळ्या मगर फस्त करेल म्हणून ग्रामस्थ व वनविभागाचे अधिकारी या मगराला पकडण्यासाठी १५ दिवसांपासून प्रयत्नशिल होते. तलावाच्या पाळीवर वनविभागाची ही कवायत बघायला नागरिकांची गर्दी राहयची. दरम्यान आज या मगरीला पकडण्यात यश आले. या मगरीचे वजन ८० किलो असून ती मादी आहे. यावेळी तहसीलदार विजय पवार, नायब तहसीलदार कांबळे, वनपरिक्षेत्राधिकारी तडस, वनरक्षक के. टी. बगमारे, क्षेत्रसहायक जांगळे, शेंदरे, दुबे, पोलिस उपनिरिक्षक बैसवार उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)