११ वर्षानंतरही शस्त्रक्रिया अनुदानापासून लाभार्थी वंचित

By Admin | Updated: June 11, 2016 00:27 IST2016-06-11T00:27:49+5:302016-06-11T00:27:49+5:30

कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्याकरिता शासन प्रोत्साहन देवून अनेक उपक्रम राबविते. वैद्यकीय अधिकारी तथा ...

After 11 years, the beneficiary from the disbursement of subsidy will be deprived | ११ वर्षानंतरही शस्त्रक्रिया अनुदानापासून लाभार्थी वंचित

११ वर्षानंतरही शस्त्रक्रिया अनुदानापासून लाभार्थी वंचित

योजनेचा बट्याबोळ : देव्हाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार
तुमसर : कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्याकरिता शासन प्रोत्साहन देवून अनेक उपक्रम राबविते. वैद्यकीय अधिकारी तथा कर्मचाऱ्यांना कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे लक्ष्य देण्यात येते. परंतु एका इसमाने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून ११ वर्षे लोटले तरी संबंधित लाभार्थ्यास शासकीय अनुदान मिळाले नाही. दप्तरदिरंगाईचा फटका येथे लाभार्थ्यास बसला.
देव्हाडी येथील रहिवासी रमेश अर्जुन श्रीवास यांना सन २००५ मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली. श्रीवास यांना दोन मुली आहेत. घरची परिस्थिती बेताची असल्याने त्यांनी कुटुंब नियोजन करण्याचे ठरविले होते. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून आता ११ वर्षे लोटले. दोन अपत्यानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यावर शासन संबंधितांना अनुदान देते.
शस्त्रक्रियेनंतर श्रीवास यांनी स्वत:चे आधार कार्ड, राशन कार्ड, बीपीएल प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, फोटो तसेच तत्सम कागदपत्रे प्राथमिक आरोग्य केंद्र, देव्हाडी येथे जमा केले.यासंदर्भात डॉ.एम.ए. कुरैशी, डॉ.शहारे व लिपीक राठोड यांना माहिती दिली. परंतु आतापर्यंत कोणतीच कारवाई झाली नाही. शासकीय चांगल्या योजनांचा कसा बट्याबोळ होतो व जनतेत कशी नाराजी निर्माण होते ते या प्रकरणांवरून दिसून येते. येथे कर्तव्यचुकार करणाऱ्या संबंधितांवर कारवाईची गरज आहे. श्रीवास यांनी उपोषणावर बसण्याचा इशारा दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: After 11 years, the beneficiary from the disbursement of subsidy will be deprived

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.