रोहिणी नक्षत्राच्या पर्वावर उन्नत शेती-समृद्ध शेतकरी मोहीम
By Admin | Updated: May 23, 2017 00:22 IST2017-05-23T00:22:27+5:302017-05-23T00:22:27+5:30
सुरु होणाऱ्या हंगामात पिकांच्या उत्पादन खर्चापेक्षा अधिक तसेच पिकांसाठी घेतलेल्या पीक कर्जापेक्षा ....

रोहिणी नक्षत्राच्या पर्वावर उन्नत शेती-समृद्ध शेतकरी मोहीम
१०८ गावात जागृती : कृषी तंत्रज्ञानाचा प्रचार होणार
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : सुरु होणाऱ्या हंगामात पिकांच्या उत्पादन खर्चापेक्षा अधिक तसेच पिकांसाठी घेतलेल्या पीक कर्जापेक्षा अधिक उत्पन्न शेतकऱ्यांना खात्रीशिर मिळावे यासाठी रोहिणी नक्षत्राच्या दिवशीपासून उन्नत शेती - समृद्ध मोहिम राबविली जाणार आहे. शेतकऱ्यांमध्ये कृषी तंत्रज्ञानाचा व योजनांची जनजागृती या मोहिमेअंतर्गत केली जाईल यासाठी तालुका कृषी अधिकारी मोहाडी कार्यालयाने तालुक्यातील १०८ गावासाठी सभेचे नियोजन केले आहे.
शेतकरी खरीप हंगामाची सुरुवात रोहिणी नक्षत्रापासून करीत असतो. खरीप हंगामामध्ये लागणारी बियाणे, खते, कीटकनाशके, सिंचन, कृषी तंत्रज्ञान आदींची माहिती शेतकऱ्यांना आधीच मिळाली पाहिजे.
याची पूर्वतयारी करण्याच्या हेतुने तसेच शासनाच्या कृषी विषयक योजनांची माहिती प्रत्यक्षपणे गावातच दिली जाण्यासाठी उन्नत शेती समृद्ध शेतकरी पंधरवाडा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. मोहाडी तालुका कृषी अधिकारी किशोर पात्रीकर यांनी १०८ गावासाठीचे नियोजन तयार केले आहे. २५ मे ते ८ मे पर्यंत गावात सकाळी ८ ते ११ या वेळेत सभेचे आयोजन करण्यात आले. २५ मे रोजी दहेगाव, वरठी, नेरी, मुंढरी बु., खडकी, जांभोरा, हरदोली झं., कांद्री, धोप, आंधळगाव या गावातून मोहिमेची सुरुवात केली जाणार आहे. मोहिमेसाठी समन्वय अधिकारी म्हणून कृषी पर्यवेक्षक व्ही.डी. झलके, एन.के. चांदेवार, ओ.पी. भट, ए.एस. सार्वे यांची नियुक्ती करण्यात आली. तर संपर्क अधिकारी म्हणून जे.ए. आकरे, बी.एन. तिजारे, एन.डी. भोंगाडे, वाय.के. नागपुरे, डी.एम. वाडीभस्मे, वाय.जी. बारापात्रे, यु.एस. निखारे, एस.एस. वाळके, पी.ए. धापटे, पी.बी. गुंडे, एस.पी. गेडाम, पी.आर. भोयर, एस.पी. आंभोरे, डी.एन. चकोले, जी.एल. समरीत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंडळ कृषी अधिकारी आर.जी. गायकवाड, व्ही.डी. झलके आदींची मार्गदर्शक म्हणून गावनिहाय टीम तयार करण्यातआली आहे. ८ जून रोजी केसलवाडा, मोरगाव, वडेगाव व चिचखेडा येथे मोहिमेचा समारोप करण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत या वर्षापासून तालुका हा कृषी विकास व उत्पादन वाढीसाठी नियोजनाचा घटक म्हणून निश्चित करण्यात आला आहे. प्रमुख पिकांची सध्याची उत्पादकता, अनुवंशिक उत्पादन क्षमता व साध्य करावयाच्या उत्पादन वाढीचा लक्षांक याबाबत प्रत्येक गावात शेतकऱ्यांच्या सभेत माहिती दिली जाईल. लक्षांक साध्य करण्याकरिता कृषी तंत्रनाची माहिती दिली जाईल. गावस्तरावरील प्रगतशील शेतकरी, पिकस्पर्धा विजेते, शेतकरी यांचे अनुभव कथनही होईल. गावातील सरपंच, ग्रा.पं. सदस्य, कृषी विज्ञान मंडळ, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या, बँक, आत्मा, संबंधित समित्या, कृषी संलग्नीत, ग्रामस्तरीय कर्मचारी यांचाही या मोहिमेत सहभाग केला जाणार आहे.