सॅनिटायझर व ताप तपासणीनंतर दिला जातो प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 05:01 IST2020-07-19T05:00:00+5:302020-07-19T05:01:21+5:30
कोरोना लॉकडाऊनचे काळात मुंढरी बु. ग्रामपंचायतीचे वतीने घनकचरा व नाल्यांची साफसफाई, चारदा गावात सॅनिटायझरची फवारणी करण्यात आली. पुणे, मुंबई व नागपूर शहरातून गावात येणाºयांना सर्वप्रथम गावाबाहेरील शाळेत क्वारंटाईन केले जाते. सरपंच एकनाथ चौरागडे जातीने हजर क्वारंटाईन नागरिकांना कोरोना काळात घ्यावयाच्या काळजीबाबत मार्गदर्शन करतात.

सॅनिटायझर व ताप तपासणीनंतर दिला जातो प्रवेश
लोकमत न्यूज नेटवर्क
करडी (पालोरा) : कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात मोहाडी तालुक्यातील मुंढरी बु. ग्रामपंचायतीमध्ये ग्रामस्थांना कर्मचाऱ्यांमार्फत सॅनिटाईज व तापाची तपासणी झाल्यानंतर प्रवेश दिला जात आहे. ग्रामस्थांकडून मास्क व फिजीकल डिस्टन्सिंगचे पालन करवून बाहेरून येणाऱ्यांना गावात क्वारंटाईन केले जात आहे.
कोरोना लॉकडाऊनचे काळात मुंढरी बु. ग्रामपंचायतीचे वतीने घनकचरा व नाल्यांची साफसफाई, चारदा गावात सॅनिटायझरची फवारणी करण्यात आली. पुणे, मुंबई व नागपूर शहरातून गावात येणाºयांना सर्वप्रथम गावाबाहेरील शाळेत क्वारंटाईन केले जाते. सरपंच एकनाथ चौरागडे जातीने हजर क्वारंटाईन नागरिकांना कोरोना काळात घ्यावयाच्या काळजीबाबत मार्गदर्शन करतात.
याबाबत कोरोना काळात सहकारी संस्था, आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, पोलीस पाटील, करडीचे ठाणेदार, तलाठी व अन्य अधिकाºयांच्या अनेकदा ग्रामपंचायतीमध्ये बैठका घेऊन त्यांचे विचार जाणून घेत गावात उपाययोना करवून घेतल्या. ग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायतीच्या वतीने सॅनिटायझर्स मशीन लावण्यात आली. तसेच शुद्ध पिण्याचे पाणी व ताप तपासणीसाठी ग्रामपंचायत कर्मचारी तैनात केले. ग्रामस्थांना सॅनिटाईज व तापाची तपासणीनंतरच प्रवेश दिला जातो. प्रत्येक वॉर्डात घाण व नाल्या उपसण्याचे काम करण्यात आले. गावात नाल्यांच्या उपासाबरोबर साफसफाई करण्यात आली. चारदा गाव सॅनिटाईज करण्यात आले. बाजाराची साफसफाई करवून घेतली जाते.
पदाधिकाºयांची तत्परता
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच गावात परजिल्ह्यातून येणाºया नागरिकांकडे येथील पदाधिकाºयांची करडी नजर आहे. यासाठी गावाबाहेरील शाळेत येणाºयांची प्रथम तपासणी केली जाते. आरोग्य अधिकारी, अंगणवाडी सेविका, आशावर्कर, आरोग्य सेविका यांची तत्परता दिसून येते.
मुंढरी ग्रामस्थांचा पुढाकार
कोरोना संकटकाळात शहरासह ग्रामीण भागात धास्ती पसरली आहे. यावर मात करण्यासाठी प्रशासन नानाविध उपाययोजना करीत आहेत. मात्र आजही अनेक नागरीक प्रशासनाला सहकार्य करीत नसल्याचे दिसून येते. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी मुंढरी वासीयांनी निर्धार केला असून त्यांच्या पुढाकारानेच येथे आदेशांची काटेकोरपणे अंमलबजावणी होत असल्याचे दिसत आहे.
मास्क व फिजीकल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन केले जाते. कोरोना काळातील या कामांमुळेच मुंढरी बु. गावाची आदर्श गावाकडे वाटचाल सुरु आहे.
- एकनाथ चौरागडे, सरपंच मुंढरी बु.
सरपंचांच्या सूचनेप्रमाणे गावातील अंतर्गत कामकाज सुरु आहेत. बाहेरुन येणाºयांची जातीने हजर राहून तपासणी केल्यानंतरच ग्रामपंचायतमध्ये प्रवेश दिला जातो. नागरिकांना सतर्कतेच्या वेळी सूचना व मार्गदर्शन केले जाते.
- अशोक बागडे, ग्रामसेवक मुंढरी बु.