गावातच मिळणार प्रशासकीय, व्यावसायिक सेवा

By Admin | Updated: September 7, 2016 00:43 IST2016-09-07T00:43:27+5:302016-09-07T00:43:27+5:30

विविध दाखले, प्रमाणपत्रांसह प्रशासकीय सेवा ते रेल्वे, बस आरक्षणासह इतरही बँकिंग सेवा आता ग्रामपंचायत सेवेतच उपलब्ध होणार आहेत.

Administrative, professional services will be available in the village | गावातच मिळणार प्रशासकीय, व्यावसायिक सेवा

गावातच मिळणार प्रशासकीय, व्यावसायिक सेवा

‘आपले सरकार सेवा केंद्र’ : विविध दाखले, प्रमाणपत्रांसह सेवाही मिळणार
तुमसर : विविध दाखले, प्रमाणपत्रांसह प्रशासकीय सेवा ते रेल्वे, बस आरक्षणासह इतरही बँकिंग सेवा आता ग्रामपंचायत सेवेतच उपलब्ध होणार आहेत. यासाठी ग्राम पंचायतीमध्येच आपले सरकार सेवा केंद्र उभारण्यात येणार आहे. साधारणपणे १५ लाख किंवा त्यापेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या ग्राम पंचायतीमध्ये किमान एक स्वतंत्र केद्र उभारण्यात येणार आहे.
पंचायत राज संस्थांच्या काराभारामध्ये ई-पंचायत प्रकल्पांतर्गत अभिप्रेत असलेली एकसूत्रता पादर्शकता आणण्यासाठी सध्या केंद्र राज्य सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. ग्रामस्थांना विविध प्रशासकीय विभागांतर्गत आवश्यक असलेली सेवा दाखले, व्यावसायिक सेवा गावतच कालबद्ध स्वरुपात मिळावी, यासाठी आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्याचा निर्णय ग्राम विकास विभागाने घेतला आहे. आपले सरकार सेवा केंद्राचे व्यवस्थापन एका कंपनीमार्फत करण्यात येणार आहे. यासाठी ग्राम पंचायत क्षेत्रात कार्य करणाऱ्या उद्योजकांची केंद्र चालक म्हणून निवड करण्यात येणार आहे. केंद्राला ग्राम पंचायतीची जागा, विद्युत इंटरनेट, कनेक्टिव्हिटी वापराची मुभा राहील.
केंद्रात मिळतील या सेवा
आपले सरकार सेवा केंद्रातून ग्रामस्थांना शासनाच्या विविध विभागांमार्फत मिळणाऱ्या सेवांसह संगणकीकृत दाखले, प्रमाणपत्र वितरित करण्यात येणार आहेत. यामध्ये जन्म नोंदणी प्रमाणपत्र, मृत्यु नोंदणी, रहिवासी दाखला, विवाहाचा दाखला, नोकरी व्यावसायासाठी नाहरकत प्रमाणपत्र, मालमत्ता फेरफार प्रमाणपत्र पत्र, नादेशप्रमाणपत्र, बेरोजगार प्रमाणपत्र, वीज जोडणीसाठी नाहरकत प्रमाणपत्र, योजनेचा फायदा घेतला नसल्याने प्रमाणपत्र, शौचालय दाखला, बांधकाम अनुमती प्रमाणपत्र, नळ जोडणी अनुमती प्रमाणपत्र निराधार योजनेसाठी वयाचा दाखला, दारिद्र्यरेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र हयातीचा दाखला, अशी ही सुविधा मिळणार आहे.
१५ लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या ग्राम पंचायतींना केंद्रासाठी उत्सुक असल्यास त्यांना आर्थिक भर द्यावा लागणार आहे. भौगोलिक स्थिती ग्राम पंचायतीची आर्थिक क्षमता लक्षात घेऊन ग्राम पंचायतीचे गट तयार करण्यात येणार आहे. (तालुका प्रतिनिधी)

व्यावसायिक सेवा उपलब्ध होणार
केंद्रामध्ये व्यावसायिक सेवाही उपलब्ध राहणार आहेत. यामध्ये रेल्वे, बसचे आरक्षण, डीटीएच रिचार्ज, बॅकिंग सेवा, आर्थिक समावेशन ई-कॉर्मस, पॅनकार्ड, आधार नोंदणी, विमा हफ्ता भरणे, पासपोर्ट आदी सेवांचा समावेश राहणार आहे. या सेवासाठी नागरिकांना इतर ठिकाणी जावे लागते. त्या याच ठिकाणी मिळणार आहेत.
बीडीओंवर राहणार जबाबदारी
आपले सेवा केंद्राबाबत गटविकास अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. केंद्रामध्ये ई-पंचायत प्रकल्प इतर अनुषंगिक योजनांबाबतची माहिती मंडळात संकेत स्थळावर भरण्यासाठी अद्ययावतीसाठी उपलब्ध करुन देणे, संकलन करणे, तपासणी करणे, प्राथमिक अहवाल घेण्याची जबाबदारी राहणार आहे.

Web Title: Administrative, professional services will be available in the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.