नाला सरळीकरणाच्या कामांना प्रशासकीय मान्यता

By Admin | Updated: June 12, 2014 23:50 IST2014-06-12T23:50:36+5:302014-06-12T23:50:36+5:30

तालुक्यातील ग्रामपंचायत मालीपार आणि टेकेपार (डोडमाझरी) येथील नाला सरळीकरणाच्या तीन कामांना मनरेगाअंतर्गत तहसीलदार भंडारा यांनी २९ लाख ३,६६५ रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे.

Administrative approval for drain works | नाला सरळीकरणाच्या कामांना प्रशासकीय मान्यता

नाला सरळीकरणाच्या कामांना प्रशासकीय मान्यता

भंडारा : तालुक्यातील ग्रामपंचायत मालीपार आणि टेकेपार (डोडमाझरी) येथील नाला सरळीकरणाच्या तीन कामांना मनरेगाअंतर्गत तहसीलदार भंडारा यांनी २९ लाख ३,६६५ रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे.
सदर कामाचा समावेश २०१४-१५ च्या नियोजनात करण्यात आला आहे. मालीपार येथील नाला सरळीकरण हे रामकृष्ण जगदेवे यांच्या शेतापासून जयेंद्र रणदिवे यांच्या शेतापर्यंत करण्यात येणार असूून यासाठी ८ लाख ६० हजार ३३७ रुपयांची अंदाजपत्रकीय तरतूद आहे. त्याचप्रमाणे टेकेपार डोड. येथील नाला सरळीकरण मोहन ठवरे यांच्या शेतापासून तुकाराम मेश्राम यांच्या शेतापर्यंत करण्यात येणार आहे. यासाठी ९ लाख १८,६२० रुपये तसेच टेकेपार डोड. येथील दुसरे नाला सरळीकरण आमगाव शिव ते पलाडी रस्ता असे करणयात येणार असून यासाठी ११ लाख २४,७०८ रुपयांची अंदाजपत्रकीय रक्कम आदेशात नमुद करण्यात आली.
उपरोक्त नाला सरळीकरणाचे काम सुरू करण्यापूर्वी व काम पूर्ण झाल्यानंतर त्याची फोटोग्राफी करणे आवश्यक आहे. संबंधित यंत्रणेनी कामाची अंमलबजावणी शासन निर्णय व परिपत्रके यांच्या अधिन राहून करण्यात यावीत.रोप वाटिकेच्या कामाला तांत्रिक मान्यता असल्यामुळे या कामासंबंधी काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास संबंधित यंत्रणेच जबाबदारी राहील असे तहसीलदार यांनी आदेशात नमूद केले आहे.(शहर प्रतिनिधी)

Web Title: Administrative approval for drain works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.