प्रशासन स्वच्छता अभियानाची दखल घेणार काय ?

By Admin | Updated: November 18, 2014 22:51 IST2014-11-18T22:51:20+5:302014-11-18T22:51:20+5:30

गावात स्वच्छता राहावी म्हणून संतानी आपल्या वाणीतून ग्रामस्थांना स्वच्छेतेचे महत्व सांगितले आहे. आता देशातील जनतेला स्वच्छता अभियानाचे महत्व विषद करण्यासाठी देशाचे

Administration will take care of cleanliness campaign? | प्रशासन स्वच्छता अभियानाची दखल घेणार काय ?

प्रशासन स्वच्छता अभियानाची दखल घेणार काय ?

पालोरा (चौ) : गावात स्वच्छता राहावी म्हणून संतानी आपल्या वाणीतून ग्रामस्थांना स्वच्छेतेचे महत्व सांगितले आहे. आता देशातील जनतेला स्वच्छता अभियानाचे महत्व विषद करण्यासाठी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वत: हातात झाडू घेवून एक आदर्श समोर ठेवला आहे. पदाधिकाऱ्यांपासून विद्यार्थीही स्वच्छतेच्या कामाला लागले आहेत. मात्र आजही ग्रामीण भागातील जनतेला स्वच्छतेचे महत्व कळले नाही.
गावागावात घाणच घाण पाहायला मिळत आहे. त्यामुळे येथे राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. तरीही स्वच्छतेबाबद कुणीही पुढाकार घेत नाही. मात्र पवनी तालुक्यातील मोखारा हा गाव जवळपास १,२०० लोकवस्तीचा आहे. हा गाव स्वच्छतेच्या बाबतीत तालुक्यात पुढे आहे.
दररोज श्रम दानातून गावातील घाण स्वच्छ करणे हे त्यांचे नित्यक्रम झाले आहे. यात येथील लालचंद नखाते यांचा महत्वपूर्ण वाटा आहे. पूर्वी हा गाव व्यसनाधीन होता. गावात घाणच-घाण पाहायला मिळत होती. तेव्हा लालचंद नखाते यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रेरणेने प्रथम गावात गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना केली. उच्च शिक्षित असून त्यांनी नोकरीच्या मागे न लागता गावाचा विकास करणे महत्वाचे ठरविले. स्वता हाता झाडू, पावळा, घमेला घेवून गाव स्वच्छतेला सुरुवात केली. जे नागरिक रस्त्यावर शौचालयाकरिता बसतात, कचरा रस्त्यावर टाकतात ते स्वच्छ करण्याचे काम सुरु केले.
उन्हाळा पावसाळा, किंवा हिवाळा असो कशालाही न घाबरता लालचंद यांचे काम नित्यक्रमाचे ठरले होते. आजही पहाटेपासून संपुर्ण गावातील कचरा उचलण्याचे काम करित आहे. गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने दररोज सांयकाळी सामूहिक प्रार्थना केली जाते. आठवड्यातून एकदा संपूर्ण गावातील रस्ते पाण्याने स्वच्छ करुन प्रभात फेरी काढली जाते. संत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गावात वृक्षलागवड केली जाते.
प्रशासनाच्या योजनेची वाट न पाहता प्रत्येकाने एक झाड लावून त्याची जोपासना करणे याबाबद गावकऱ्यांनी मोलाचा वाटा घेतला आहे. लालचंद मागील ३० वर्षापासून गावात स्वच्छता करीत आहे. वृक्षारोपण व स्वच्छतेबद्दल गावकऱ्यांना जागृत करण्यात यांचा मोलाचा वाटा आहे. आज हा गाव स्वच्छतेच्या बाबतील तालुक्यात अग्रेसर आहे. श्रमदानातून गावकरी गाव स्वच्छ करीत आहेत.
गावातील बरेच नागरिक व्यसनापासून दूर झाले आहेत. गाव जरी लहान असला तरी शासनाच्या प्रत्येक योजना गावात सर्व मिळवून राबवीत असतात. लालचंदचा पुढाकार त्याचे कर्तव्य तालुक्यात चर्चचा विषय ठरत आहे. त्यांना प्रसिध्द आणि पद या पासून ते कोसोदूर आहेत. त्यांचे अनुकरण दुसऱ्यांनी करायला पाहिजे. मात्र या संदर्भात कुणालाही वेळ दिसत नाही. अनेकांचे टोमने येकून शुध्दा लालचंदचा हा नित्यक्रम आजही सुरु आहे. या बाबद संबंधित प्रशासनाचे याची दखल घ्यायला पाहिजे मात्र असे झाले नाही हि एक खंताची बाब म्हणावी लागेल. (वार्ताहर)

Web Title: Administration will take care of cleanliness campaign?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.