शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी मुलांचे वसतिगृह भाड्याच्या इमारतीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 00:35 IST

आदिवासी बांधवांसाठी अनेक शासकीय योजना आहेत. राज्य व केंद्रात स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करण्यात आली आहे. तुमसर शहरात आदिवासींच्या मुलांना उच्चशिक्षणासाठी सोय म्हणून वसतिगृहाची निर्मिती राज्य शासनाने केली. परंतु गत २० वर्षांपासून आदिवासी मुलांचे वसतिगृह भाड्याच्या खोलीत सुरु आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । तुमसरमध्ये २० वर्षांपासून प्रतीक्षा, कोट्यवधींच्या निधीचा भाड्यातच चुराडा

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : आदिवासी बांधवांसाठी अनेक शासकीय योजना आहेत. राज्य व केंद्रात स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करण्यात आली आहे. तुमसर शहरात आदिवासींच्या मुलांना उच्चशिक्षणासाठी सोय म्हणून वसतिगृहाची निर्मिती राज्य शासनाने केली. परंतु गत २० वर्षांपासून आदिवासी मुलांचे वसतिगृह भाड्याच्या खोलीत सुरु आहे. आतापर्यंत भाड्याच्या नावाखाली कोट्यवधींचा चुराडा झाला आहे.तुमसर तालुक्यात ४५ गावे आदिवासी बहुल आहेत. संपूर्ण भंडारा जिल्ह्यात तो उच्चांक आहे. शहरात आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह १९९९ मध्ये शासनाने सुरु केले. गत २० वर्षापासून ते भाड्याच्या इमारतीत सुरु आहे. आतापर्यंत लाखो रुपये भाड्यापोटी देण्यात आले आहे. आठव्या वर्गापासून पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या ७५ विद्यार्थ्यांची व्यवस्था या वसतिगृहात करण्यात आली आहे. मुलींच्या वसतिगृहाचे काम २०१८ मध्ये पूर्ण झाले. नवीन इमारतीत वसतिगृह हलविण्यात आले. सुमारे ४ कोटींची वसतिगृहाची इमारत शहरातील शासकीय आयटीआय समोर आहे.दुसरीकडे मुलांचे वसतिगृह भंडारा रोडवरील खापा टोलीत असून त्यासाठी मासिक ५० हजार रुपये भाडे मोजले जात असल्याची माहिती आहे. मुलांच्या वसतिगृहासाठी आदिवासी संघटनांनी अनेकदा आंदोलने केली. परंतु उपयोग झाला नाही. शासनाने येथे कायम दुर्लक्ष केल्याचा आरोप माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक उईके यांनी केला आहे. मुलींच्या वसतिगृहाजवळ मुलांचे वसतिगृहासाठी जागा उपलब्ध आहे. परंतु निधी दिला जात नाही. त्यामुळे आदिवासी मुलांना शिक्षण घेताना अनंत अडचणीचा सामना करावा लागतो. लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप उईके यांनी केला आहे.आदिवासी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण निवासी शिक्षण मिळावे यासाठी शासनाच्या विविध योजना आहे. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीही दिली जाते. तुमसर तालुक्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी बहुल गावे आहेत. या गावातील विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी तुमसर शहरात येतात. परंतु वसतीगृह भाड्याच्या खोलीत असल्याने तेथे पुरेशा सुविधा मिळत नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी आर्थिक भार सहन करून शहरात भाड्याची रूम करून राहतात.वसतीगृहात सुविधांचाही अभाव दिसून येतो. यासाठी तुमसर येथे आदिवासी मुलांचे वसतीगृह उभारण्याची गरज निर्माण झाली असून लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे आहे.ओबीसी मुलींचे वसतिगृह नाहीतुमसर शहरात समाजकल्याण विभागाचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वसतिगृह आहे. तेही भाड्याच्या इमारतीत सुरु आहे. परंतु मुलींचे वसतिगृह अद्यापही सुरु करण्यात आले नाही. त्यामुळे ओबीसींच्या मुलींची शिक्षणासाठी फरफट होत आहे. तुमसर तालुक्याच्या शेवटच्या गावाचे अंतर ४५ किमी आहे.त्यामुळे ये जा करणे मुलींना शक्य होत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक मुली आपले शिक्षण अर्ध्यावरच सोडून देतात. तालुक्यातील अनेक गावात हायस्कूलपर्यंतच शाळा आहे. शिक्षणासाठी त्यांनी भंडारा किंवा तुमसरला यावे लागते. अनेक पालक भंडारा शहर दूर पडत असल्याने तुमसरला पसंती देतात. मात्र येथे ओबीसींच्या मुलींसाठी वसतीगृह नसल्याने आर्थिक भार सहन करून रूम भाड्याने घेऊन रहावे लागते. मुलींच्या सुरक्षेची काळजी पालकांना सतावत असते.