शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
2
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
3
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
4
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!
5
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
6
जगन्नाथ रथयात्रा: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
7
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
8
गृहकर्ज स्वस्त झाल्यानंतरही मुंबईत घर घेणं महाग! पण देशातील 'हे' शहर आहे बजेट फ्रेंडली; किती पडतो हप्ता?
9
'आता बांबू, शेण आणि सेंद्रिय कचऱ्यावर चालणार गाड्या', नितीन गडकरींनी सांगितली सरकारची योजना
10
जाम घाबरलेला रोहित शर्मा; किंग कोहलीच्या रुपात देवच पावला! टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील खास किस्सा
11
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर
12
'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा
13
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
14
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
15
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
16
दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
17
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 
18
नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली
19
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
20
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!

आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 06:00 IST

जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात आदर्श आचार संहितेसंदर्भात सर्व नोडल अधिकाºयांची बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस सर्व शासकीय कार्यालयातील शासकीय योजनांचे तसेच राजकीय व्यक्तींचे फोटो असलेले पोस्टर, बॅनर फ्लेक्स, कटआऊट्स २४ तासाच्या आत काढून टाकावेत.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी : भंडारा येथे सर्व नोडल अधिकाऱ्यांची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भारत निवडणूक आयोगातर्फे विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीची घोषणा करण्यात आली असून आदर्श आचार संहिता शनिवारपासून लागू झालेली आहे. जिल्ह्यातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आदर्श आचार संहितेची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात आदर्श आचार संहितेसंदर्भात सर्व नोडल अधिकाºयांची बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस सर्व शासकीय कार्यालयातील शासकीय योजनांचे तसेच राजकीय व्यक्तींचे फोटो असलेले पोस्टर, बॅनर फ्लेक्स, कटआऊट्स २४ तासाच्या आत काढून टाकावेत. सार्वजनिक इमारतीवरील जसे रेल्वे स्टेशन, बसस्थानक, शासकीय बसेस, टेलिफोन खांब, विद्युत खांब, नगरपालिका, स्थानिक स्वराजय संस्थेच्या इमारतीवरील राजकीय जाहिराती ४८ तासाच्या आत काढण्याची कार्यवाही करावी. लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद अध्यक्ष, सभापती, नगर परिषद अध्यक्ष, पंचायत समिती सभापती इत्यादी लोकप्रतिनिधींना दिलेली शासकीय वाहने तात्काळ जमा करावी. आचारसंहितेच्या कालावधीत कोणतीही निविदा प्रक्रिया, निविदा उघडणे, कार्यरंभ आदेश, नवीन काम सुरु करता येणार नाही.विद्युत बिल, टेलिफोन बिलावर राजकीय नेत्यांचे फोटो छापू नये. तसेच शासकीय कार्यालयाच्या संकेतस्थळावरील राजकीय नेत्यांचे फोटो काढून टाकावेत. भूमिपूजन, उद्घाटनाच्या जागेवरील मजकूर झाकून ठेवावा. आदर्श आचार संहितेच्या कालावधीत शासकीय कर्मचाºयांनी त्यांच्या मोबाईलवरुन किंवा सोशल मिडियावरुन कोणत्याही पक्षाचा उमेदवाराच्या प्रचाराच्या पोस्ट शेअर करु नये, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.आचार संहितेच्या कालावधीत नैसर्गिक आपत्तीचे काम करता येईल. पूर, दुष्काळ किंवा इतर नैसर्गिक आपत्तीमुळे प्रभावित असलेल्या क्षेत्रातील जनतेसाठी मदत व पुनर्वसन कार्य सुरु करता व ठेवता येईल. आपत्तीमधील कोणतेही काम करता येईल. तसेच गंभीर आजारी असलेल्या व्यक्तीला उचित मान्यतेने रोख रक्कम किंवा वैद्यकीय सेवा देणे सुरु ठेवता येईल, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप, डॉ. सुभाष पवार, उपविभागीय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, अप्पर पोलीस अधिक्षक अनिकेत भारती, उपवन संरक्षक विवेक होशिंग, निवासी उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी वंदना सौरंगपते तसेच सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019