शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

नईम शेख खून प्रकरणात आणखी एका आरोपीची भर; आतापर्यंत ९ जणांना अटक, एक फरार

By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: September 28, 2023 21:07 IST

पोलिसांनी मुख्य सूत्रधार संतोष डहाट याला अटक केल्यानंतर त्याचा मोबाईल ताब्यात घेऊन तपासणी केली असता लकी घडले याने खुणाच्या दिवशी तब्बल ३३ कॉल केलेले दिसून आले. यावरून त्याला ताब्यात घेऊन आज (गुरुवारी) अटक करण्यात आली.

भंडारा : तुमसर तालुक्यातील मॅग्नीज आणि रेती व्यावसायिक नईम शेखचा खून झाला त्या दिवशी दिवसभर पाळत ठेवून असलेल्या आणि मुख्य सूत्रधाराला नईम शेखची संपूर्ण माहिती पुरविणाऱ्या लकी मनोज घडले (२६, नाकाडोंगरी, ता.तुमसर) याला पोलिसांनी आज अटक केली. त्याच्या अटकेमुळे या खून प्रकरणातील गुन्हेगारांची संख्या दहावर पोहोचली आहे, एक आरोपी फरार आहे.

पोलिसांनी मुख्य सूत्रधार संतोष डहाट याला अटक केल्यानंतर त्याचा मोबाईल ताब्यात घेऊन तपासणी केली असता लकी घडले याने खुणाच्या दिवशी तब्बल ३३ कॉल केलेले दिसून आले. यावरून त्याला ताब्यात घेऊन आज (गुरुवारी) अटक करण्यात आली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता ३ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनवण्यात आली आहे.

मध्यप्रदेशातून घेतले होते नवीन सिम आणि मोबाईलनईम शेख याचे लोकेशन संतोष डहाट याला पुरविण्यासाठी लकीने गेल्या आठवड्यातच मध्य प्रदेशातील बोनफाटा येथून एक सिमकार्ड आणि नवीन मोबाईल खरेदी केला होता. घटनेच्या दिवशी सोमवारी दुपारी एक वाजतापासून त्याने नईम शेखवर पाळत ठेवून त्याची संपूर्ण माहिती संतोष डहाटला पुरविली होती. फक्त चार तासात त्याने  संतोषच्या मोबाईलवर ३३ कॉल केलेले तपासात आढळून आले. संपूर्ण कार्यभाग आटोपल्यानंतर काही झालेच नाही अशा अविर्भावात तो गावात परतला होता.

लकी करायचा पतसंस्थेत कामयापूर्वी लकी घडले एका पतसंस्थेत काम करायचा. त्यानंतर त्याने ते काम सोडून टॅक्सीचा व्यवसाय सुरू केला होता. दरम्यान तो संतोष दहाच्या संपर्कात आला. नईम शेखच्या खून प्रकरणात तो इन्फॉर्मर ठरला. नईम शेखच्या लोकेशनची त्याने संपूर्ण माहिती कळविली नसती, तर हा खूनच झाला नसता, असा युक्तिवाद वकिलांनी न्यायालयात करून लकीचा मुख्य आरोपीमध्ये समावेश करण्याची विनंती केली.

आरोपींची संख्या दहावरया प्रकरणी आरोपींची संख्या आता दहावर पोहोचली आहे. अटक केलेल्यांमध्ये संतोष डहाट, त्याचा भाऊ सतीश डहाट (दोघेही आंबेडकर वार्ड, तुमसर), शुभम उर्फ सागर पंधरे (नवीन हसारा टोली तुमसर), गुणवंत उर्फ अतुल यवकार (३०, नाका वाडी, नागपूर), आशिष नेवारे (३२, जयताळा, नागपूर), रवी रतन बोरकर (३५, जरीपटका, नागपूर), दिलखुश उर्फ मोनू कोल्हटकर (२८, मालवीय नगर, तुमसर) आणि अमन मेश्राम (२९, आंबेडकर वार्ड तुमसर) यांचा समावेश आहे. तर विशाल मानेकर (३२, हुडको कॉलनी, नागपूर) हा अद्यापही फरार आहे. पोलिसांचे पथक त्याच्या मागावर आहे.या सर्व आरोपींवर कलम ३०२, १४३, १४७, १४८, १४९ सह कलम ३/२५, ४/२५, २७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDeathमृत्यू