‘व्हाईट इंक’च्या नशेचे मुलांमध्ये जडतेय व्यसन

By Admin | Updated: April 12, 2015 01:06 IST2015-04-12T01:06:11+5:302015-04-12T01:06:11+5:30

शहरातील गर्दीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लहान मुले व काही मुलांना खांद्यावर घेऊन भिक्षा मागणाऱ्या महिला दिसतात.

Addictive addiction in White Kids' addiction | ‘व्हाईट इंक’च्या नशेचे मुलांमध्ये जडतेय व्यसन

‘व्हाईट इंक’च्या नशेचे मुलांमध्ये जडतेय व्यसन

लोकमत स्टिंग आॅपरेशन
तथागत मेश्राम / देवानंद नंदेश्वर वरठी / भंडारा
शहरातील गर्दीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लहान मुले व काही मुलांना खांद्यावर घेऊन भिक्षा मागणाऱ्या महिला दिसतात. अनेक ठिकाणी दुकाने फिरुन भिक्षा मागतात. भिक्षा मागताना त्यांचा केविलवाणा प्रकार व दयनीय अवस्था पाहून इच्छा नसतानाही पुण्य कमविण्याचा नादात दुकानदार व प्रवाशी त्यांना पैसे देतात. कधीकधी तर ही मुले पैशासाठी लोटांगण घालुन, हातपाय पकडून पैसे मागतात. परंतु त्यांना मिळणाऱ्या दक्षिण्यातून ते ^‘नशा’ करीत असल्याचे ‘लोकमत’ च्या ‘स्टिंग आॅपरेशन’मध्ये आढळून आले आहे.
वरठी येथील रेल्वे स्थानक, भंडारा बस स्थानक, व्यापारपेठ, हॉटेल्स, आठवडी बाजार, सार्वजनिक ठिकाण, लग्न समारंभ, उत्सव आदी ठिकाणी व दुकानांमध्ये फिरुन भिक्षा मागणाऱ्या मुलांचा सदर प्रतिनिधीने शोध घेतला. त्यामध्ये सर्वाधिक लहान मुले व मुली आढळून आले. पोटासाठी भिक्षा मागणे व मिळालेल्या पैशातून दुकानांमध्ये सहजरित्या उपलब्ध होणारे व्हाईट इंक व प्लॉस्टीकचे वस्तु चिपकविण्यासाठी उपयोगात येणारे लोशन नशेसाठी वापरत असल्याचे आढळून आले.
बहुतांश मुले ही बिऱ्हाड घेऊन आलेल्या स्थलांतरीत कुटुंबातील आहेत. हे कुटुंब गावातील एखाद्या खुल्या जागेत तंबु टाकून राहत असतात. त्यांचे पालक काय करतात हे त्यांनाही ठाऊक नाहीत. परंतु ही मुले सकाळपासून रात्री उशिरापर्यंत गावात फिरुन पैसे जमा करीत असतात. ‘नशा’ करण्याकरिता वापरण्यात येणारे व्हाईट इंक किंवा लोशन पुरते पैसे जमा झाले की ते दुकानातून खरेदी करतात. त्यानंतर कपड्यावर ओतून त्याचा गंध सुंगतात. त्यातील गंध संपला की पुन्हा पैसे गोळा करणे आणि ते लोशन विकत घेणे असा प्रकार दिवसभर सुरु राहतो.
शहरातीलही काही मुलांना व्हाईट इंक व लोशनच्या नशेची सवय जडल्याची माहिती समोर आली आहे. बहुतांश पालक कार्यालयीन किंवा घरगुती कामासाठी व्हाईट इंक घरी आणून ठेवत असतात.
याचा नेमका फायदा घेऊन ही लहान मुले नकळत नशा करीत आहेत. सहज म्हणून केलेला प्रयोग पुढे जाऊन त्यांची सवय होत आहे. यासाठी घरुन पैसे चोरणे, दुकानातून सामान पळविण्यासारख्या घटना घडत आहेत. पुढे जावून ही मुले बिडी, सिगारेट, तंबाखूच्या आहारी जातात. व्यसनाची सवय लागलेले अल्पवयीन मुले मद्यपान, गांजा ओढायला लागल्याचे निदर्शनास आले आहे.
याकरिता पालकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. शाळेतील शिक्षक व पालकांनी नियमित मुलाचे दप्तर तपासण्याची गरज आहे. व्हाईट इंकची शिशी हुंगून नशा करतात म्हणून कपंनीने व्हाईट इंक बंद केले असले तरी बाजारात मोठ्या प्रमाणावर ते उपलब्ध आहेत.

Web Title: Addictive addiction in White Kids' addiction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.