बाबांनी दिले व्यसनमुक्त जीवन
By Admin | Updated: November 4, 2015 00:37 IST2015-11-04T00:37:43+5:302015-11-04T00:37:43+5:30
महान त्यागी बाबा जुमदेव यांनी समाजात वावरणाऱ्या दु:खी पीडित मानवाला जीवन जगण्याचा खरा अर्थ समाजाला दिला.

बाबांनी दिले व्यसनमुक्त जीवन
नाना पटोले : साकोलीत कोजागिरी कार्यक्रम
साकोली : महान त्यागी बाबा जुमदेव यांनी समाजात वावरणाऱ्या दु:खी पीडित मानवाला जीवन जगण्याचा खरा अर्थ समाजाला दिला. जीवन जगताना व्यसनमुक्तीचा धडा शिकविला. समाजात मानवाने मानवाशी कसे वागले पाहिजे, अशी शिकवण दिली, असे मत खासदार नाना पटोले यांनी केले. साकोली येथील परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ शाखातर्फे रविवारी आयोजित कोजागिरी कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी मंचावर संस्थेचे अध्यक्ष वसंतराव ठेंगडी, सचिव देवदास वलथरे, सहसचिव संजय साठवणे, अनिक चांदेवार, वासुदेव वाडीभस्मे, पंढरी वाडीभस्मे, हेमकृष्ण वाडीभस्मे उपस्थित होते.
नाना पटोले म्हणाले की, मानवधर्मात आज लाखो सेवक व्यसनमुक्त जीवन जगत आहेत. ही सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. यात सेवकाचा आदर्श इतरांनीही घ्यावा.
शासनाने या व्यसनमुक्ती चळवळीला चालना दिली असून शासनस्तरावरुन आवश्यक ती उपाययोजना सुरु आहे. यावेळी सकाळपासुन विविध सांस्कृतीक कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन देवदास वलथरे यांनी तर आभार प्रदर्शन पिंटू वाडीभस्मे यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)