उडान संस्थेतर्फे महिलांसाठी उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:24 IST2021-02-19T04:24:46+5:302021-02-19T04:24:46+5:30

महिलांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी गत अनेक वर्षांपासून उडान एक कदम आगे या सामाजिक संस्थेतर्फे तुमसर शहरात महिलांसाठी ...

Activities for women by the flying organization | उडान संस्थेतर्फे महिलांसाठी उपक्रम

उडान संस्थेतर्फे महिलांसाठी उपक्रम

महिलांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी गत अनेक वर्षांपासून उडान एक कदम आगे या सामाजिक संस्थेतर्फे तुमसर शहरात महिलांसाठी विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. ग्रामीण भागातही असे कार्यक्रम घेतले जावेत, अशी मागणी ग्रामीण युवतींनी संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा कल्याणी भुरे यांच्याकडे लावून धरली होती. त्यानुसार वरठी येथे संगीता सुखानी, मोहाडी येथे रिता भाजीपाले, तुमसर शहर रंजना ठाकरे, सिहोरा येथे प्रीती बांगरे, नाकडोंगरी येथे फैमिदा शेख यांची संयोजिका म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ग्रामीण युवती व महिलांनी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून घेण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने नावनोंदणी करून सदस्यता घ्यावी, असे आवाहन संस्थापक अध्यक्षा कल्याणी भुरे यांनी केले आहे.

Web Title: Activities for women by the flying organization