शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

कार्यकर्त्यांनो, प्रचार करताना ही काळजी घ्या, अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2024 14:14 IST

नियमभंग केल्यास होणार कारवाई : निवडणूक विभागाचे राहणार लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर आता जणू एक उत्सवच सुरू झाला आहे. या काळात कार्यकर्ते अधिक उत्साही असतात. मात्र, अति उत्साहात नियम मोडला गेल्यास त्यावर यंत्रणेची नजर राहणार आहे. अनेकदा मतदारसंघ मोठा असल्यामुळे अनेक उमेदवार कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयल करत असतात. मात्र, उमेदवाराचा प्रचार करताना कार्यकर्त्यांनाही आचार संहितेचे पालन करावे लागणार आहे. त्यांच्यावरही काही नियम, निर्बंध घातले आहेत.

आदर्श आचार संहितेचे पालन होण्यासाठी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी संपूर्ण यंत्रणेला निर्देश दिले आहेत. त्यासाठी आढावासुध्दा घेतला जाणार आहे. 

प्रचार वाहनांसाठी परवानगी प्रचार वाहनांसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक आहे. अर्ज, वाहनाचे आरसी बुक सादर करणे, वाहनाचा विमा, कर भरणा पावती, पीयूसी, फिटनेस प्रमाणपत्र, प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे नाहरकत प्रमाणपत्र सादर करावे लागेल. वाहनाचा चारही बाजूचा फोटो, तसेच संबंधीत वाहनासाठी पोलिसांचा नाहरकत दाखला आवश्यक आहे.

झेंडे, भित्तिपत्रके लावण्यास निर्बंध खासगी जागेत झेंडे, भित्तिपत्रके लावण्यासाठी मालकाच्या परवानगीची आवश्यकता. झेंड्याच्या काठ्या उभारणे, कापडी बॅनर, घोषणा लिहिण्यासाठी संबंधित यंत्रणेची परवानगी आवश्यक, इमारतीचे आवार, भिंती यावर पत्रक, जाहिराती लावण्यासाठी जागा मालकाची परवानगी आवश्यक आहे.

इथे ध्वनिक्षेपकास मनाई आहे पोलिस अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय ध्वनिक्षेपक वापरता येणार नाही. सकाळी सहा वाजण्यापूर्वी आणि रात्री १० वाजल्यानंतर ध्वनिक्षेपक वापरावर बंदी आहे. ध्वनिक्षेपकासह फिरणाऱ्या वाहनास प्रतिबंध करण्यात आला आहे. फिरणाऱ्या वाहनांनी ठिकाणी थांबूनच प्रचार करावा. ध्वनिक्षेपकाचा वापर, विशिष्ट ध्वनिक्षेपकाच्या परवानगीची माहिती कळविणे बंधनकारक आहे.

"निवडणुकीदरम्यान प्रचार करताना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. त्यात प्रचार वाहन, ध्वनिक्षेपक, झेंडे, बॅनर अशा सर्वच घटकांसाठी त्या- त्या विभागांची परवानगी घ्यावी लागणार आहे. आचारसंहितेचे सर्व राजकीय पक्षांनी काटेकोरपणे पालन करणे करावे." - डॉ. संजय कोलते, जिल्हाधिकारी

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४bhandara-acभंडाराCode of conductआचारसंहिता