तुमसर तालुक्यात शिकारी टोळी सक्रिय

By Admin | Updated: November 22, 2014 22:56 IST2014-11-22T22:56:25+5:302014-11-22T22:56:25+5:30

जंगलव्याप्त तुमसर तालुक्यातील बराचसा भाग आदिवासीबहुल भागात आहे. या तालुक्यात वनसंपदा अधिक असून वन्यप्राण्यांचे अधिवासही आहे. त्यामुळे या परिसरात वन्यप्राण्यांच्या शिकारी

Activist group active in Tumsar taluka | तुमसर तालुक्यात शिकारी टोळी सक्रिय

तुमसर तालुक्यात शिकारी टोळी सक्रिय

तुमसर : जंगलव्याप्त तुमसर तालुक्यातील बराचसा भाग आदिवासीबहुल भागात आहे. या तालुक्यात वनसंपदा अधिक असून वन्यप्राण्यांचे अधिवासही आहे. त्यामुळे या परिसरात वन्यप्राण्यांच्या शिकारी करण्यासाठी टोळ्या सक्रीय झाल्या आहेत. त्यामुळे वन्यपशू व वन्यप्राण्यांच्या शिकारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मागील काही महिन्यापासून वन्यप्राण्यांची शिकारी सुरु असूनही वनअधिकारी व त्यांचे खबरे अनभिज्ञ आहेत.
तुमसर तालुक्यांतर्गत तीन वनपरिक्षेत्र येतात. त्यात लेंडेझरी, नाकाडोंगरी व तुमसर वनपरिक्षेत्राचा समावेश आहे. तुमसर वनपरिक्षेत्राचा विस्तार कमी असून घनदाट जंगल कोका अभयारण्यात समाविष्ट झाला आहे. लेंडेझरी व नाकाडोंगरी वनक्षेत्र सातपुडा पर्वतरांगात असून घनदाट जंगलात आहे. शिकारीचे मांस विकत घेणारे ग्राहक निश्चित असल्यामुळे परस्पर विल्हेवाट लावण्यात येते. त्यामुळे शिकारीच्या घटनेची कुठेही वाच्यता होत नाही. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Activist group active in Tumsar taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.