बोगस शिक्षकांवर कारवाई होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 22:03 IST2018-10-27T22:03:16+5:302018-10-27T22:03:46+5:30
शिक्षकांच्या बदली प्रक्रीयेत बोगस माहिती सादर करून लाभ घेणाऱ्या शिक्षकांच्या जागा मोकळया करून विस्थपित शिक्षकांना न्याय देणार असून काही बदलीमध्ये अपंगत्वाचे लाभ घेणाऱ्या शिक्षकांना मेडिकल मंडळापुढे सादर होण्यास कार्यवाही करण्यात आली आहे, असे आश्वासन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी दिले.

बोगस शिक्षकांवर कारवाई होणार
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शिक्षकांच्या बदली प्रक्रीयेत बोगस माहिती सादर करून लाभ घेणाऱ्या शिक्षकांच्या जागा मोकळया करून विस्थपित शिक्षकांना न्याय देणार असून काही बदलीमध्ये अपंगत्वाचे लाभ घेणाऱ्या शिक्षकांना मेडिकल मंडळापुढे सादर होण्यास कार्यवाही करण्यात आली आहे, असे आश्वासन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी दिले.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघच्या वतीने मुख्य कार्यपालन अधिकारी जगताप, उपमुख्य कार्यपालन अधिकारी मंजुषा ठवकर व शिक्षणाधिकारी यांचेशी वारंवार चर्चा करून अंतर जिल्हा बदली ११७ शिक्षकांचे प्रश्न, जिल्ह्यातील विस्थपित शिक्षकांवर झालेला अन्याय, अनेक दिवसांपासून वैद्यकीय प्रतिपूर्ती व विविध थकबाकीचे प्रश्न याबाबत जिल्हाध्यक्ष मुबारक सैय्यद यांच्या नेतृत्वात शिक्षकांच्या मागण्या पूर्ण करण्यात यश प्राप्त केले.
११७ आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांचा दोन महिन्याचा पगार आणि एकस्तर प्रकरण याबाबत तात्काळ कार्यवाही करण्यासंबंधाने शिक्षणाधिकारी पाच्छापूरे यांनी पत्र काढले. कोणतीही चूक नसताना जिल्ह्यातील काही शिक्षकांना 'आॅन लाईन' बदल्यामध्ये विस्थपित केले गेले आणि 'रँडम'मध्ये त्यांना दूर अंतरावर पाठविले गेले, अशा शिक्षकांना त्यांच्या मागणी नुसार कार्यशाळा लावून सेवाजेष्ठतेनुसार सामावून घेण्यासाठी लवकरच कार्यशाळेचे आयोजन करण्याचे मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी आश्वासन दिले. त्यासाठी उर्वरित उच्च श्रेणी मुख्याध्यापकांची कार्यशाळा व इतर प्रमोशन कार्यशाळा लावून काही बदलीमध्ये बोगस माहिती सादर करून लाभ घेणाऱ्या शिक्षकांच्या जागा मोकळया करून विस्थपित शिक्षकांना न्याय देणार असे मान्य केले.
अनेक वर्षापासून तालुक्यात वैद्यकीय प्रतिपूर्ती व इतर थकबाकीची मागणी प्रलंबित असल्याने शिक्षणाधिकारी स्तरावर सर्व तालुक्यातून मागणी गोळा करून जिल्हा स्तरावरून शिक्षकांच्या खात्यावर त्यांची थकबाकी जमा करण्यासंबंधाने पत्र काढल्याचे सांगितले.
यासाठी जिल्हाध्यक्ष मुबारक सैय्यद, सरचिटणीस सुधीर वाघमारे, शिक्षक नेते राजेश सूर्यवंशी, पतसंथा अध्यक्ष संजीव बावनकर, कार्याध्यक्ष मुकेश मेश्राम, कोषाध्यक्ष राजू सिंगनजुडे, उपाध्यक्ष रमेश कटेखाये, महिला प्रमुख रजनी करंजेकर, राज्य संघाचे राधेश्याम आमकार , विनायक मोथारकार, खेडीकर, संचालक दिलीप बावनकर, शाखाध्यक्ष भैया देशमुख, अनिल गयगये, राकेश चिचामे, राजन सव्वालाखे, विकास गायधने, नामदेव गभने, दिनेश घोडीचोर, शंकर नखाते, सुरेंद्र उके, कैलास बुद्धे, हितेश उके, चेतन बोरकर,महेश गावंडे, हरिदास घावडे, दशरथ जीभकाटे,सुरेश वैद्य, सुरेश हर्षे, प्रमोद हटेवार,दिनेश गायधने, नागफासे, कोमल चव्हाण, गौरीशंकर वासनिक, ईश्वर निकुडे, उत्तम कुंभारगावे, शिवानंद नालबंद, योगेश बोरकर, उमेश गायधने तथा जिल्हा व तालुका कार्यकारिणी यांनी परिश्रम घेतले.