रेल्वे न्यायाधीशांची प्रवाशांवर कारवाई

By Admin | Updated: August 29, 2015 00:55 IST2015-08-29T00:55:17+5:302015-08-29T00:55:17+5:30

तुमसर रोड रेल्वे स्थानकावर सुमारे ५० प्रवाशांसह गावकऱ्यांना २७ हजारांचा दंड ठोठावण्यात आला.

Action on railway judges | रेल्वे न्यायाधीशांची प्रवाशांवर कारवाई

रेल्वे न्यायाधीशांची प्रवाशांवर कारवाई

२७ हजारांचा दंड वसूल : रेल्वे न्यायाधीश पथकाची तुमसर रोड येथे कारवाई
तुमसर : तुमसर रोड रेल्वे स्थानकावर सुमारे ५० प्रवाशांसह गावकऱ्यांना २७ हजारांचा दंड ठोठावण्यात आला. ही कारवाई रेल्वे न्यायाधीशांच्या पथकाने शुक्रवारी सकाळी १० ते दुपारी १२ च्या दरम्यान केली.
दर तीन महिन्यांनी रेल्वे प्रशासन सदर कारवाई नागपूर विभागातील रेल्वे स्थानकावर अतिशय गोपनीय पध्दतीने करते. शुक्रवारी नागपूर येथील रेल्वे न्यायाधीश एस. एन. फड यांच्या नेतृत्वात कारवाई करण्यात आली. सुमारे ५० प्रवाशांसह स्थानिक नागरिकांना २७ हजार ७०० रुपयांचा दंड ठोकण्यात आला. यात विना तिकीट प्रवास करणे, रेल्वे फलाटावर विना विकीट प्रवेश करणे, रेल्वे टॅक ओलांडणे याचा त्यात समावेश आहे.
या पथकात रेल्वे पोलिसांचे तुमसर रोड येथील पोलीस निरक्षक महेंद्र सिंह, योगेश रायपुरकर, सुरेश नेवारे, रेल्वे पोलीस उपनिरीक्षक उषा बिसेन, दिक्षीत खोब्रागडे, झोडे यांचा समावेश होता. तुमसर रोड जंक्शन असून येथे रेल्वे स्थानकाच्या मुख्य फाटकाकडे जाण्यास फूटवे ब्रीज नाही. यामुळे ग्रामस्थांना झालेला आर्थिक भूर्दंड सहन करावा लागतो. रेल्वे प्रशासनाने आतापावेतो ही समस्या सोडविली नाही. याकडे लोकप्रतिनिधीचेही दुर्लक्ष होत आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Action on railway judges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.