आंबाटोली येथील लॉनवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:33 IST2021-03-25T04:33:54+5:302021-03-25T04:33:54+5:30
पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी दिलेल्या आदेशानुसार २२ मार्च रोजी गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्याच्या निरीक्षक वैशाली पाटील यांच्यासह ...

आंबाटोली येथील लॉनवर कारवाई
पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी दिलेल्या आदेशानुसार २२ मार्च रोजी गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्याच्या निरीक्षक वैशाली पाटील यांच्यासह पोलीस स्टेशन परिसरात पेट्रोलिंग करीत असताना त्यांनी लॉनवर कारवाई केली आहे. आंबाटोली फुलचूर येथे असलेल्या त्या लॉनवर लग्नाच्या स्वागत समारंभाचा कार्यक्रम सुरू होता. त्या कार्यक्रमात ५० पेक्षा जास्त लोकांची गर्दी जमलेली होती.
त्यावरून कार्यक्रमाची परवानगी विचारली असता त्यांच्याकडे त्या कार्यक्रमाकरिता ५० लोकांची परवानगीपत्र असल्याचे सांगितले. परंतु, त्या कार्यक्रमस्थळी ५० पेक्षा जास्त लोकांची गर्दी जमा होती. परिणामी पोलीस हवालदार बालाजी कोकोडे यांच्या तक्रारीवरून गोंदिया ग्रामीण पोलिसांनी भादंविच्या कलम १८८, २६९, सहकलम ५१(ब) आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.