पोलिसांच्या षडयंत्राने मुलांवर कारवाई
By Admin | Updated: July 22, 2014 23:53 IST2014-07-22T23:53:05+5:302014-07-22T23:53:05+5:30
हिंदुत्ववादी संघटना असलेली बजरंग दलाचा जिल्हा प्रमुख पदाधिकारी असलेल्या प्रवीण उदापुरे व पंकज उदापुरे यांच्यावर भंडारा पोलिसांनी षडयंत्र रचून गुन्हे दाखल केले. हे सर्व गुन्हे खोटे असून माझ्या

पोलिसांच्या षडयंत्राने मुलांवर कारवाई
भंडारा : हिंदुत्ववादी संघटना असलेली बजरंग दलाचा जिल्हा प्रमुख पदाधिकारी असलेल्या प्रवीण उदापुरे व पंकज उदापुरे यांच्यावर भंडारा पोलिसांनी षडयंत्र रचून गुन्हे दाखल केले. हे सर्व गुन्हे खोटे असून माझ्या मुलांना पोलिसांनी नाहक फसविल्याचा आरोप मनोहर उदापुरे यांनी पत्रपरिषदेतून केला आहे.
यावेळी त्यांनी पुढे सांगताना, बजरंग दलाचे कार्य करीत असताना माझा मुलगा प्रविण हा सामाजिक व धार्मिक भावनेतून काम करीत आहे. दरम्यान त्याने अनेकदा धार्मिक स्वरूपाच्या बाबींसाठी आंदोलने केले. यामुळे त्याच्यावर पोलिसांनी गुन्ह्यांची नोंद केली आहे. दरम्यान घरी पाहुणे बसले असताना भंडारा पोलीस ठाण्याचा एक पोलीस कर्मचारी घरी येवून त्याने प्रविण उदापुरेला ठाण्यात बोलविल्याचे सांगितले.याबाबत मी स्वत: पोलीस स्टेशनला मुलावरील आरोपांच्या तक्रारीच्या अनुषंगाने माहिती घेण्याकरीता गेलो असता पोलिसांनी माझ्याशी असभ्यपणाची वर्तणूक दिली. व प्रविणवर तडीपारीची कारवाई करावयाची असल्याचे सांगत त्यांनी त्याला पोलीस स्टेशनला आणले. यानंतर कुठल्याही पद्धतीची शहानिशा न करता पोलिसांनी मोठ्या ताफ्यासह माझ्या घरी येऊन लहान मुलगा पंकजला भंडारा पोलीस ठाण्यात नेले. यानंतर त्याला लॉकअपमध्ये आरोपीसारखी वागणूक दिली. प्रविणला पकडण्याकरीता पोलिसांनी अनेक टीम बनविली. वेळोवेळी घरी येऊन आमचे मानसिक शोषण केले. माझे दोन्ही मुले निर्दोष असून पोलिसांनी त्यांना षडयंत्रात फसवून त्यांच्यावर कारवाई केली असून यात दोषी असलेल्या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी मनोहर उदापुरे यांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)