बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध कारवाई
By Admin | Updated: June 11, 2015 00:28 IST2015-06-11T00:28:19+5:302015-06-11T00:28:19+5:30
भंडारा शहरातील बाजारपेठेत येणारे नागरिक आपली वाहने मनमर्जीने कुठेही उभे करतात.

बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध कारवाई
भंडारा शहरातील बाजारपेठेत येणारे नागरिक आपली वाहने मनमर्जीने कुठेही उभे करतात. परिणामी वाहतूक व्यवस्था विस्कळीत होते. त्यामुळे वाहतुकीत अडथळा आणणाऱ्या वाहनधारकांविरुद्ध कारवाई करण्याच्या दृष्टीने शहर वाहतूक शाखेने पाऊल उचलले आहे. रस्त्यावर उभे असलेल्या दुचाकी, आॅटो, चारचाकी वाहनांना जॅमर बसवून वाहनधारकांकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.