शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

जिल्ह्यात आडमार्गाने प्रवेश करणाऱ्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 05:01 IST

भंडारा जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावरून रेड झोन असलेल्या नागपूर शहरातून अनेक जण विना परवाना आणि लपून-छपून प्रवेश करतात. नागपूरवरून येणारे अनेक जण खरबी नाका चुकवून शहरात प्रवेश करतात. त्यामुळे कोरोना प्रादूर्भावाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. अशा पद्धतीने भंडारा जिल्ह्यात प्रवेश करणाºया आणि नियमांचे उल्लंघन करणाºयांना कडक कारवाईला सामोरे जावे लागेल असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : सुरक्षा यंत्रणेत वाढ, अफवा पसरवू नका

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात कोरोनाबाधीत रुग्ण आढळल्यानंतर प्रशासन ‘अ‍ॅक्शन मोड’वर आले असून रेडझोनमधून चोरून-लपून आडमार्गाने भंडारा जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन यांनी दिले आहे. जिल्ह्यातील सुरक्षा यंत्रणेत वाढ करण्यात आली असून अफवा पसरविणाºयांवरही कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले.भंडारा तालुक्यातील गराडा बुज. येथील एक महिला कोरोनाबाधीत असल्याचे सोमवारी पुढे आले. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. कोरोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्थेसंबंधी, जिल्ह्यातील पोलीस अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगरपरिषद, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी आणि इतर विभागाच्या विभागप्रमुखांची बैठक मंगळवारी जिल्हा परिषद सभागृहात घेण्यात आली. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रमोद खंडाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मिलिंद मोटघरे उपस्थित होते.भंडारा जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावरून रेड झोन असलेल्या नागपूर शहरातून अनेक जण विना परवाना आणि लपून-छपून प्रवेश करतात. नागपूरवरून येणारे अनेक जण खरबी नाका चुकवून शहरात प्रवेश करतात. त्यामुळे कोरोना प्रादूर्भावाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. अशा पद्धतीने भंडारा जिल्ह्यात प्रवेश करणाºया आणि नियमांचे उल्लंघन करणाºयांना कडक कारवाईला सामोरे जावे लागेल असे जिल्हाधिकाºयांनी सांगितले. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, सोशल मिडीयावर कोरोनाबाबत अफवा व फेक न्यूज पसरविणे गुन्हा असल्याचा पुनरुच्चार त्यांनी या बैठकीत केला. जिल्ह्यातील नऊ चेकपोस्टवर आता कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नियमांचे उल्लंघन करून प्रवेश करणाऱ्या व्यक्तीवर कलम १४४ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी सांगितले.राष्ट्रीय महामार्गावर जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करताना दुकानदार खासगी वाहनातून मालवाहतूक करताना आढळले आहेत. अशा मालवाहतूक करताना दुकानदारांनी परवानाधारक मालवाहतूक वाहनांमधूनच जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणे बंधनकारक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. किराणा असोसिएशनची बैठक घेण्याचे निर्देशही देण्यात आले.औषधांचा मुबलक साठा ठेवाकोरोना प्रादूर्भाव रोखण्यासाठीच्या उपाययोजना अंतर्गत खासगी डॉक्टर्स असोसिएशनची बैठक घेऊन चर्चा करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. आरोग्य यंत्रणेने पीपीई, मास्क, सॅनिटायझरचा मुबलक साठा ठेवावा, कोवीड सेंटरमध्ये सर्व स्टाफची उपस्थिती आवश्यक असून औषधांचा मुबलक साठा ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. औषध विक्रेत्यांची बैठक घेऊन औषधांचा तुटवडा भासणार नाही याबाबत त्यांना अवगत करावे असे त्यांनी सांगितले. या बैठकीत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास यांनी कोवीड-१९ च्या नियोजनाची सादरीकरणाद्वारे माहिती दिली. कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सज्ज असून गावागावात सर्वेक्षण केले जात आहे. बाहेरगावावरुन येणाऱ्यांवरही करडी नजर आहे.अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अपडाऊन बंदजिल्ह्यातील अनेक शासकीय अधिकारी व विविध कार्यालयाचे कर्मचारी आणि बँकांचे कर्मचारी दररोज नागपूर व इतर ठिकाणाहून येणेजाणे करीत होते. मात्र आता कोरोनाचा रुग्ण आढळल्याने या सर्वांना अपडाऊन बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.नमाज पठन घरातच करावेसध्या रमजान महिना सुरु असून याबाबत योग्य नियोजन करावे, नमाज पठन घरातच करण्यात यावे, रस्त्यावर किंवा अन्य ठिकाणी एकत्र जमण्यास मनाई करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन यांनी सांगितले.सर्व परवानग्या रद्दकोरोनाबाधीत रुग्ण आढळल्याने प्रशासनाची जबाबदारी वाढली आहे. अशा स्थितीत कोवीड - १९ विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जनजीवन विस्कळीत होणार नाही याची काळजी घेऊन जिल्ह्यातील सुरक्षा यंत्रणा अधिक कडक करण्यात आली आहे. जिल्हा ग्रीन झोनमध्ये असल्याने जीवनावश्यक वस्तूंसह इतर काही दुकाने उघडण्याचे आदेश २० एप्रिल पासून जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र आता रुग्ण आढळून आल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडता नगरपरिषदामार्फत देण्यात आलेले सर्व दुकानांचे परवाने रद्द करून ही सर्व दुकाने २८ एप्रिलपासून पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहेत.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारी