लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आवेष्टीत वस्तू नियम व वजनमाप नियमाचा भंग केल्या प्रकरणी येथील वैधमापन शास्त्र विभागाने जिल्ह्यातील १५ विक्रेत्यांवर कारवाई केली. त्यांच्याकडून ४२ लाख रुपयांचे शुल्क वसुल करण्यात आले आहे. या कारवाईने विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.वैधमापन शास्त्र कार्यालयाचे सहाय्यक नियंत्रण रा.व. भास्करे यांच्या मार्गदर्शनात दिवाळीपासून जिल्हाभर मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेंतर्गत ठिकठिकाणी तपासणी करण्यात आली. सदर मोहीमेत डब्ब्यासहीत मिठाईचे वजन केल्या प्रकरणी दोन विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. तसेच नियमांचा भंग केल्याप्रकरणी १५ विक्रेत्यांवर कारवाई झाली. आॅक्टोबर २०१८ पर्यंत फेरीवाले, दुकानदार यांच्याविरुद्ध १५२ प्रकरणे नोंदविण्यात आले. तसेच तराजू, वजनमापे, इलेक्ट्रॉनिक्स काटे यांच्या पडताळणी मुद्रांकनाबाबत ४२ लाख फी वसूल करण्यात आली. या मोहीमेत निरीक्षक कोहरु, खुरसळे, तोंडरे, मुल, भारती नंदेश्वर सहभागी झाले होते.भंडारा शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी अप्रमाणित वजनकाट्यांचा वापर केला जातो. यातून ग्राहकांची मोठी फसवणूक होते. सणासुदीच्या काळात होणाऱ्या या फसवणुकीचा ग्राहकांना मोठा फटका बसतो. अनेकदा तक्रार करूनही कारवाई केली जात नाही. भंडारा वैधमापन विभागाने धडक कारवाई सुरु केली असून ही कारवाई कायमस्वरुपी करावी अशी मागणी आहे.
जिल्ह्यात १५ विक्रेत्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 22:13 IST
आवेष्टीत वस्तू नियम व वजनमाप नियमाचा भंग केल्या प्रकरणी येथील वैधमापन शास्त्र विभागाने जिल्ह्यातील १५ विक्रेत्यांवर कारवाई केली. त्यांच्याकडून ४२ लाख रुपयांचे शुल्क वसुल करण्यात आले आहे. या कारवाईने विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.
जिल्ह्यात १५ विक्रेत्यांवर कारवाई
ठळक मुद्दे४२ लाख शुल्क वसूल : वैधमापन विभागाची मोहीम