शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
2
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
3
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
4
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
5
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
6
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
7
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
9
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
10
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
11
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
12
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
13
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
14
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
15
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
16
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
17
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?
18
जय श्रीराम! राम दर्शनासाठी आता लाइन लावावी लागणार नाही, पासही नको; अयोध्येत नवीन व्यवस्था
19
Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट
20
Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट

दरोडा टाकणाऱ्या ‘त्या’ आरोपींना अटक

By admin | Updated: May 16, 2017 00:22 IST

लाखनी परिसरात रात्री गस्तीदरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार घुसर व त्यांच्या पथकाला ..

स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी : अन्यथा लाखनीत मोठी घटना घडली असतीलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : लाखनी परिसरात रात्री गस्तीदरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार घुसर व त्यांच्या पथकाला दोन इसम दुचाकीने आदर्श नगर, कृषी उत्पन्न बाजार समिती लाखनीजवळ संशयितरीत्या फिरताना दिसून आले. त्यांना थांबवुन विचारपुस केली असता उडवाउडवीचे उत्तरे दिल्याने संशय बळावला. कसुन चौकशी केली असता त्यांची बनवाबनवी उघडकीस आली.चुन्नीलाल रतिराम उईके (२४) रा.पंढरपूर (सावली) ता.देवरी, जि.गोंदिया. हल्ली मुक्काम सोनेगाव निपानी, ता.हिंगणा, जि.नागपूर, हरीचंद अरुण मेश्राम (२६) रा. उमरी (लवारी) हल्ली मुक्काम रहाडी, ता.मौदा, जि.नागपूर असे सांगितले त्यांची अंगझडती घेतली असता, चुन्नीलाल उईके याचे ताब्यातील एक फिक्कट खाकी रंंगाची बॅग ज्यावर फेसबुक लिहीलेले होते. त्यात एक लोखंडी हातोडी व भरीव दांडा होता. एका बाजुला गोल व दुसऱ्या बाजुला खिळे काढण्याकरीता व्ही आकाराची खाच असलेले शस्त्र होते. एक लोखंडी एल आकाराचा भरीव रॉड, एक लोखंडी तलवार तर हरीचंद मेश्राम याचे ताब्यातील एक दुचाकी क्र. एमएच ३१/ए टी ८१०४ आढळून आले.सदर दोन्ही इसम हे मध्यरात्री शस्त्रानिशी जबरी चोरी, दरोडा घालण्याचे पुर्वतयारीत असल्याने मोठी जबरी चोरी, दरोडा टळला, असे दिसून आले आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक सुरेश घुसर व त्यांच्या पथकाने केली. सदर कारवाई पोलीस अधीक्षक विनीता साहू, अपर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार घुसर, पो.नि. गायकवाड पो.स्टे. साकोली सहा. पोलीस निरीक्षक कमलेश सोनटक्के, सहा. फौजदार नेपालचंद्र टिचकुले सहा. फौजदार प्रितीलाल रहांगडाले, पोहवा बंडू नंदनवार, पोहवा मंगल कुथे, पोहवा संजु कुंजरकर, पोहवा अनिल चव्हान, पोहवा भजने साकोली, दिनेंद्र आंबेडारे, बबन अतकरी, पोशि अनुप वालदे, रमाकांत बोंद्रे, चेतन पोटे, स्नेहल गजभिये, वैभव चामट, कौबिक गजभिये, ड्रायव्हर पोहवा रामटेके, राधेशम ठवकर, मनोज अंबादे यांनी केली आहे.