दरोडा टाकणाऱ्या ‘त्या’ आरोपींना अटक

By Admin | Updated: May 16, 2017 00:22 IST2017-05-16T00:22:24+5:302017-05-16T00:22:24+5:30

लाखनी परिसरात रात्री गस्तीदरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार घुसर व त्यांच्या पथकाला ..

The accused who are involved in robbery are arrested | दरोडा टाकणाऱ्या ‘त्या’ आरोपींना अटक

दरोडा टाकणाऱ्या ‘त्या’ आरोपींना अटक

स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी : अन्यथा लाखनीत मोठी घटना घडली असती
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : लाखनी परिसरात रात्री गस्तीदरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार घुसर व त्यांच्या पथकाला दोन इसम दुचाकीने आदर्श नगर, कृषी उत्पन्न बाजार समिती लाखनीजवळ संशयितरीत्या फिरताना दिसून आले. त्यांना थांबवुन विचारपुस केली असता उडवाउडवीचे उत्तरे दिल्याने संशय बळावला. कसुन चौकशी केली असता त्यांची बनवाबनवी उघडकीस आली.
चुन्नीलाल रतिराम उईके (२४) रा.पंढरपूर (सावली) ता.देवरी, जि.गोंदिया. हल्ली मुक्काम सोनेगाव निपानी, ता.हिंगणा, जि.नागपूर, हरीचंद अरुण मेश्राम (२६) रा. उमरी (लवारी) हल्ली मुक्काम रहाडी, ता.मौदा, जि.नागपूर असे सांगितले त्यांची अंगझडती घेतली असता, चुन्नीलाल उईके याचे ताब्यातील एक फिक्कट खाकी रंंगाची बॅग ज्यावर फेसबुक लिहीलेले होते. त्यात एक लोखंडी हातोडी व भरीव दांडा होता. एका बाजुला गोल व दुसऱ्या बाजुला खिळे काढण्याकरीता व्ही आकाराची खाच असलेले शस्त्र होते. एक लोखंडी एल आकाराचा भरीव रॉड, एक लोखंडी तलवार तर हरीचंद मेश्राम याचे ताब्यातील एक दुचाकी क्र. एमएच ३१/ए टी ८१०४ आढळून आले.
सदर दोन्ही इसम हे मध्यरात्री शस्त्रानिशी जबरी चोरी, दरोडा घालण्याचे पुर्वतयारीत असल्याने मोठी जबरी चोरी, दरोडा टळला, असे दिसून आले आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक सुरेश घुसर व त्यांच्या पथकाने केली.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक विनीता साहू, अपर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार घुसर, पो.नि. गायकवाड पो.स्टे. साकोली सहा. पोलीस निरीक्षक कमलेश सोनटक्के, सहा. फौजदार नेपालचंद्र टिचकुले सहा. फौजदार प्रितीलाल रहांगडाले, पोहवा बंडू नंदनवार, पोहवा मंगल कुथे, पोहवा संजु कुंजरकर, पोहवा अनिल चव्हान, पोहवा भजने साकोली, दिनेंद्र आंबेडारे, बबन अतकरी, पोशि अनुप वालदे, रमाकांत बोंद्रे, चेतन पोटे, स्नेहल गजभिये, वैभव चामट, कौबिक गजभिये, ड्रायव्हर पोहवा रामटेके, राधेशम ठवकर, मनोज अंबादे यांनी केली आहे.

Web Title: The accused who are involved in robbery are arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.