त्या आरोपींना १७ जुलैपर्यंत कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:23 IST2021-07-08T04:23:52+5:302021-07-08T04:23:52+5:30

सहा. अभियंताना मारहाण प्रकरण मोहाडी : वीजचोरी पकडण्यासाठी गेलेल्या सहाय्यक अभियंता सुधीर कुमरे यांना मारहाण करणाऱ्या आरोपींना १७ जुलैपर्यंत ...

The accused were remanded in custody till July 17 | त्या आरोपींना १७ जुलैपर्यंत कोठडी

त्या आरोपींना १७ जुलैपर्यंत कोठडी

सहा. अभियंताना मारहाण प्रकरण

मोहाडी : वीजचोरी पकडण्यासाठी गेलेल्या सहाय्यक अभियंता सुधीर कुमरे यांना मारहाण करणाऱ्या आरोपींना १७ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी मोहाडी यांनी दिले आहेत.

मोहाडी तालुक्यातील उसर्रा हद्दीत ही धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी आंधळगाव पोलिसांनी संबंधीत आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तुमसर - रामटेक रस्त्यावरील उसर्रा शेतशिवारालगत असलेल्या माजी खासदार शिशुपाल पटले यांच्या जागेसंबंधी नाहरकत प्रमाणपत्र पडताळणी करून जांबकडे परत जात असतांना उसर्रा पुलाजवळील विद्युत डीपीजवळ ग्रिप हातात घेऊन आरोपी देवदास बोपचे हे बसले होते. सहाय्यक अभियंता कुमरे यांनी आरोपीला ग्रिपबद्दल माहिती विचारली असता आरोपी बोपचे हे घरातून घरामागे असलेल्या शेतात पळाले. त्यांचा पाठलाग करीत सहाय्यक अभियंता सुधीर कुमरे व गार्ड तेथे गेले असता त्यांना विहिरीजवळ असलेल्या विद्युत खांबावरून आरोपी वायर काढीत होते. अभियंत्यांनी या घटनेचे मोबाईलमध्ये फोटो काढले व तुम्ही बेकायदेशीर वीज चोरी करीत आहात, तुमच्यावर कारवाई करावी लागेल, असे बोलताच सहाय्यक अभियंता सुधीर कुमरे यांना आरोपींनी शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून मोबाईल व पाकीट हिसकावून घेतले असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली होती.

याप्रकरणात सहाय्यक अभियंता सुधीर कुमरे यांच्या फिर्यादीवरून आंधळगाव पोलिसांनी आरोपीच्या विरोधात भादंवि कलम ३५३, ३२४, ३३२, ५०४, ४२७, १३४, १४७ नुसार गुन्हा दाखल करून आरोपी देवदास बोपचे (४१), सुकदास बोपचे (४६), लत्ता देवदास बोपचे (३५), शुभम शरणागते (१९, सर्व रा. उसर्रा) अशा चार आरोपींना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले होते. यातील एक आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला सूचनापत्र देण्यात आले आहे. पुढील तपास आंधळगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश मट्टामी यांच्या मार्गदर्शनात, पोलीस उपनिरीक्षक गणेश पडवार, पोलीस शिपाई नवनाथ सिदणे, रमेश काळे करीत आहेत.

Web Title: The accused were remanded in custody till July 17

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.