प्राॅपर्टी डिलरच्या खुनातील आरोपी पोलिसांच्या टप्प्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:34 IST2021-04-06T04:34:43+5:302021-04-06T04:34:43+5:30
भंडारा : शहरालगतच्या बेला येथील प्राॅपर्टी डिलरच्या खून प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या टप्प्यात आले असून लवकरच त्यांना अटक केली जाईल, ...

प्राॅपर्टी डिलरच्या खुनातील आरोपी पोलिसांच्या टप्प्यात
भंडारा : शहरालगतच्या बेला येथील प्राॅपर्टी डिलरच्या खून प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या टप्प्यात आले असून लवकरच त्यांना अटक केली जाईल, अशी माहिती भंडाराचे ठाणेदार लोकेश कानसे यांनी दिली.
समीर बंकीमचंद्र दास (५८) याचा धारदार शस्त्राने रविवारी खून केल्याचे उघडकीस आले होते. याप्रकरणी भंडारा ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भंडारा पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आरोपींचा शोध घेत आहेत. नेमका खून कोणत्या कारणाने झाला आणि कुणी केला याचा तपास केला जात आहे. या प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या टप्प्यात आले असून त्यांना लवकरच अटक करण्यात येईल आणि या खुनाचे रहस्य उलगडले जाईल असे ठाणेदार कानसे यांनी सांगितले. दरम्यान, सोमवारी दिवसभर या प्रकरणातील आरोपींचा शोध सुरू होता.