पवनारा येथील पुलावर अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 23:42 IST2017-11-07T23:42:32+5:302017-11-07T23:42:59+5:30
तुमसर-कटंगी आंतरराज्यीय मार्गावरील पवनारा येथील पुलावर ट्रेलरच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने केबिनचा भाग खाली कोसळता कोसळता वाचला.

पवनारा येथील पुलावर अपघात
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनारा : तुमसर-कटंगी आंतरराज्यीय मार्गावरील पवनारा येथील पुलावर ट्रेलरच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने केबिनचा भाग खाली कोसळता कोसळता वाचला. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. ही घटना सोमवारला रात्री १० वाजताच्या सुमारास घडली.
चुरी भरून जबलपुरहून वर्धा येथे जात असलेला ओएफसी ट्रॉन्सपोर्ट नागपूरचा ट्रेलर क्रमांक सीजी ०४ एचपी ५५५७ च्या चालकाने नियंत्रण सुटल्याने ट्रेलरचा सामोरील भाग पुलाची रॅलींग तोडून खाली लोंबकळत राहिला. सुदैवाने कोणतीही अनुचित घटना घडली नाही. चालकाने वेळीच लक्ष देऊन ट्रेलरला नियंत्रित केले.
या ब्रिटीशकालीन पुलाला १२५ वर्षे पुर्ण झाले असून अपघाताचे पुल म्हणून परिसरात ख्याती आहे. बाजुला नवीन पुलाचे बांधकाम सुरू असून तीन वर्षापासून पुर्ण झाले नाही. बांधकामाला अजून किती कालावधी लागणार हे संबधित विभागालाच माहित. या पुलावरून दररोज ओव्हरलोड वाहतूक होत असून लहान मोठे अपघात घडत असतात.कदाचित नवीन पुलाचे बांधकाम पूर्ण झाले असते तर असा प्रकार घडला नसता.