अपघात :
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 23:16 IST2018-03-28T23:16:19+5:302018-03-28T23:16:19+5:30
राष्ट्रीय महामार्ग मुंडीपार शिवारात ट्रक अनियंत्रित झाल्यामुळे झाडावर आदळला. यात ट्रकला अकस्मात लागलेल्या आगीत चालकाचा भाजून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारला पहाटे ४ वाजताच्या सुमारास घडली.

अपघात :
राष्ट्रीय महामार्ग मुंडीपार शिवारात ट्रक अनियंत्रित झाल्यामुळे झाडावर आदळला. यात ट्रकला अकस्मात लागलेल्या आगीत चालकाचा भाजून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारला पहाटे ४ वाजताच्या सुमारास घडली. ट्रक नं.सी.जे. ०४ एल जे ५५२५ हा ट्रक कोरबा (छत्तीसगड) वरून सिलवासा (गुजरात) ला अॅल्युमिनियम वायर रोल घेऊन जात होता. नागपूरवरून रायपूरकडे जाणाऱ्या ट्रकला धडक झाल्यामुळे ट्रक अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर धडकला. ट्रक चालक विशाल अशोक टेकाम (२३) रा. सडक अर्जुनी हा घटनास्थळी ठार -झाला. बॅटरीच्या शॉर्ट सर्किटमुळे ट्रकने पेट घेतल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. हा ट्रक रणजितसिंह सैनी टेका नाका नागपूर यांच्या मालकीचा आहे.