शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
3
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
4
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
5
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
6
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
7
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
8
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
9
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
11
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
12
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
13
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
14
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
15
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
16
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
17
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
18
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
19
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
20
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात 60 टक्के पुरूष करतात तंबाखू सेवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 05:00 IST

प्राचीन काळापासून तंबाखूचे सेवन केले जाते. निकाटिआना टॅबकम असे तंबाखूचे शास्त्रीय नाव आहे. अल्कलाईड या रासायनिक गटात मोडणारे निकोटीन हे द्रव्य तंबाखूच्या मुळामध्ये तयार होते. हे द्रव्य रोपाच्या पानामध्ये साठवले जाते. रोपट्यातील जवळपास ६४ टक्के निकोटीन पानामध्ये असते. त्यामुळेच तंबाखूच्या पानाचा उपयोग केला जातो. निकोटीन वेगाने रक्तप्रवाहात मिसळू शकते.

ठळक मुद्देमहिलांचे प्रमाण २० टक्के : राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्व्हेक्षणातील धक्कादायक वास्तव, ग्रामीणमध्ये अधिक प्रमाण

ज्ञानेश्वर मुंदेलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तंबाखू सहज उपलब्ध होणारा नशेचा प्रकार. मळूण खाणे, विडी, सिगारेटच्या माध्यमातून ओढणे, पानात घालून चघळणे आणि खर्रा अशा विविध प्रकारे तंबाखूचे सेवन केले जाते. तरूणांपासून वृद्धांपर्यंत अनेक जण तंबाखूच्या आहारी गेले असून एकदा लागलेली तंबाखूची सवय सुटता सुटत नाही. भंडारा जिल्ह्यात ६०.७ टक्के पुरूष आणि १९.७ टक्के महिला तंबाखूचे सेवन करीत असल्याचे धक्कादायक वास्तव राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्व्हेक्षणातून पुढे आले आहे. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात तंबाखूचे सेवन करण्याचे प्रमाणत अधिक आहे.प्राचीन काळापासून तंबाखूचे सेवन केले जाते. निकाटिआना टॅबकम असे तंबाखूचे शास्त्रीय नाव आहे. अल्कलाईड या रासायनिक गटात मोडणारे निकोटीन हे द्रव्य तंबाखूच्या मुळामध्ये तयार होते. हे द्रव्य रोपाच्या पानामध्ये साठवले जाते. रोपट्यातील जवळपास ६४ टक्के निकोटीन पानामध्ये असते. त्यामुळेच तंबाखूच्या पानाचा उपयोग केला जातो. निकोटीन वेगाने रक्तप्रवाहात मिसळू शकते. निकोटीन त्वचेतून तर शरीरात चटकन शिरते. रक्तप्रवाहात शिरकाव झाल्यापासून १० ते २० सेकंदात संपूर्ण शरीरभर पसरते. मेंदूपर्यंत पोहचून नशा चढल्याचा काही काळ अनुभव देते. निकोटीनचा प्रमाण काही काळाने शुद्ध रक्त पुरवठ्याने कमी होतो. ही भावना परत निकोटीनेचे अर्थात तंबाखूचे सेवन करण्यास उद्युक्त करते आणि लागते तंबाखूची सवय.जिल्हा ग्रामीण बहुल जिल्हा आहे. तंबाखूचे सेवन करणाऱ्यांची संख्या मोठी असल्याचे दिसून येते. १५ वर्षावरील पुरूषांचे प्रमाण ६०.६७ टक्के आहे. तर याच वयोगटातील महिलांचे प्रमाण १९.७ टक्के आहे. विशेष म्हणजे राज्याचे पुरूषांचे प्रमाण ३३.८ टक्के तर महिलांचे प्रमाण १०.९ टक्के आहे. राज्याचा विचार करता भंडारा जिल्ह्यात दुप्पट व्यक्तींना तंबाखूचे व्यसन असल्याचे दिसून येते. ग्रामीण भागात तंबाखूला चूना लावून मळून खाण्याचे प्रमाण अधिक आहे. तंबाखूमुळे कर्करोगासह इतर विविध आजार होत असल्याची प्रत्येकाला जाणीव असली तरी व्यसन सूटता सूटत नाही. अनेकांनी तंबाखू सोडण्याचा प्रयत्न केला.तंबाखू सोडणे सहज शक्य आहे. त्यासाठी इच्छाशक्तीची गरज आहे. अनेक जण आज तंबाखूमुक्त जीवन जगत असल्याचे दिसून येते.राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कायदा प्रभावहीनल्ल शासकीय कार्यालयासह सार्वजनिक ठिकाणी तंबाखू आणि धूम्रपान करण्यास कायद्याने बंदी आहे. त्यासाठी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कायदा २००३ अस्तित्वात आहे. शाळा, महाविद्यालयाच्या २०० मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांना बंदी घातली आहे. परंतु असे असताना शासकीय कार्यालयासह सार्वजनिक ठिकाणी तंबाखू आणि धूम्रपान करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. शासकीय कार्यालयाच्या भींती आणि कोपरे पान- खर्ऱ्याने रंगलेल्या दिसून येतात. ठिकठिकाणी फलक लावले असले तरी त्याचा उपयोग होत नाही. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कायदा प्रभावहीन दिसून येतो.तंबाखूमुक्त शाळा अभियान प्रभावील्ल विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी भंडारा जिल्ह्यात तंबाखूमुक्त शाळा अभियान राबविण्यात येत आहे. शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, तंबाखू नियंत्रण कार्यक्रम आणि सलाम मुंबई फाऊंडेशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात मोहीम राबविण्यात आली. त्याचे सकारात्मक परिणामही दिसू लागले आहे.तरूणांमध्ये खर्रा खाण्याचे प्रमाण अधिकल्ल सुपारीचे तुकडे आणि तंबाखू याचे मिश्रण करून तयार होणारा खर्रा तरूणांमध्ये अधिक लोकप्रिय आहे. पानठेल्यावर २० रुपयापासून ५० रुपयांपर्यंत खर्राची पुडी विकत मिळते. अनेक ठिकाणी तर खर्रा घोटण्यासाठी स्वंचलीत मशीन आणल्या आहेत. सुगंधी तंबाखू आणि इतर मिश्रण टाकून घोटलेला खर्रा खाणे प्रतीष्ठेचे झाले आहे. तरूणांसोबतच महिलांमध्येही खर्रा खाण्याची क्रेज अलिकडे वाढत आहे. शेतात आणि बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या मजूर महिला खर्रा सेवन करतात.ल्ल तंबाखूचे व्यसन सोडण्यासाठी प्रामुख्याने हवी असते ती इच्छाशक्ती. तंबाखू सेवन करणाऱ्याची इच्छा असेल तर नक्कीच तंबाखूच्या व्यसनापासून दूर जाता येते. तंबाखूचे व्यसन सोडायचे असे तर ओव्यासोबत लिंबाचा रस मिसळून त्यामध्ये काळे मीठ मिसळा. हे मिश्रण दोन दिवस तंबाखूच्या ऐवजी तोंडात ठेवल्यास तंबाखू खान्याची इच्छा कमी होईल. 

टॅग्स :Tobacco Banतंबाखू बंदी