परसोडी येथे अब्दुल कलाम यांची पुण्यतिथी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:34 IST2021-07-29T04:34:30+5:302021-07-29T04:34:30+5:30
जवाहरनगर : ओम सत्यसाई बहुउद्देशीय शिक्षण संस्था ठाणा द्वारे संचालित ओम सत्यसाई कला, विज्ञान महाविद्यालय परसोडी येथे ...

परसोडी येथे अब्दुल कलाम यांची पुण्यतिथी
जवाहरनगर : ओम सत्यसाई बहुउद्देशीय शिक्षण संस्था ठाणा द्वारे संचालित ओम सत्यसाई कला, विज्ञान महाविद्यालय परसोडी येथे डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी प्रा. ज्योती रामटेके यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वर्षा भुरे प्रा. मिथुन मोथरकर, प्रा. अरविंद डोंगरे, प्रा. हर्षानंद वसेकर, प्रा. महादेव हटवार, प्रा. वर्षा दंढारे उपस्थित होते. प्रा. रामटेके यांनी भाषणातून डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जीवनातील कार्य,राष्ट्रपती असताना केलेले कार्य आणि मिसाईल मॅन म्हणून ओळख कशी निर्माण झाली, याबाबत माहिती दिली. प्रमुख पाहुणे प्रा..वर्षा भुरे यांनी डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांची लेखक म्हणून ओळख कशी निर्माण झाली व त्यांनी लिहिलेल्या ‘अग्निपंख’ या प्रसिद्ध पुस्तकाबद्दल माहिती दिली. संचालन व आभार प्रा. प्रतिक घुले यांनी केले. कार्यक्रमासाठी शिक्षकेतर कर्मचारी महादेव खंडाळे,रामकृष्ण आकरे,कुमुद कोचे,संध्या उरकुडे, तुलाराम वासनिक, राजेश चोपकर,दीपक आकरे,चंदा शेंडे यांनी सहकार्य केले .