अबब... त्याच ठिकाणी पुन्हा नियुक्तीचा प्रताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:15 IST2021-09-02T05:15:17+5:302021-09-02T05:15:17+5:30

पूर्व विदर्भातील भंडारा जिल्हा हा मागासलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. परंतु सेटिंगच्या मामल्यात अधिकाऱ्यांच्या बडेजावपणा पाहायला मिळतो. एकाच जागेवर ...

Abb ... the glory of re-appointment in the same place | अबब... त्याच ठिकाणी पुन्हा नियुक्तीचा प्रताप

अबब... त्याच ठिकाणी पुन्हा नियुक्तीचा प्रताप

पूर्व विदर्भातील भंडारा जिल्हा हा मागासलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. परंतु सेटिंगच्या मामल्यात अधिकाऱ्यांच्या बडेजावपणा पाहायला मिळतो. एकाच जागेवर तीन वर्षे नोकरी केल्यावर दुसऱ्या ठिकाणी किंवा प्रतिनियुक्तीवर स्थानांतरण करण्यात येते. मात्र भंडारा जिल्हा परिषदेच्या एका विभागांतर्गत काही कर्मचाऱ्यांना तीन वर्षे सेवा पूर्ण झाली असतानाही त्याच ठिकाणी पुन्हा नियुक्त करण्यात आले आहे. आधी "शासकीय काम तासभर थांब" अशी म्हणण्याची वेळ यायची. आता तर शासकीय काम कुठलेही असो पटकन व्हायलाच हवे. चिरीमिरी आणि साहेबांची कृपा असली तर नियुक्तीवर नियुक्तीचा भोंगळ कारभार सर्रासपणे पाहायला मिळत आहे. दरम्यान, या नियुक्तीच्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हात ओले केल्याचीही जिल्ह्यात सर्वदूर माहिती आहे. पण यंत्रणा सेट असल्याने कारवाईची अपेक्षाही शून्य झाली आहे.

Web Title: Abb ... the glory of re-appointment in the same place