शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

कारागृहातून सुटलेल्या आरोपीकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2023 18:13 IST

लाखांदूर पोलिसांनी तत्परतेने पोहचून आरोपी युवकाला घेतले ताब्यात

गोपालकृष्ण मांडवकर

भंडारा : मागील चार वर्षांपूर्वी एका महिलेच्या अत्याचार व खून प्रकरणी शिक्षा भोगून कारागृहातून सुटलेल्या आरोपीने एका अल्पवयीन बालिकेचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली. ही घटना २९ जून रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास तालुक्यात घडली आहे. या घटनेत पीडित अल्पवयीन बालिकेच्या तक्रारीवरून राजेश उर्फ राजू व्यंकट शहारे (३०) नामक आरोपी युवकाविरोधात विनयभंगाच्या विविध कलमांसह पोक्सो कायद्यांतर्गत लाखांदूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस सूत्रानुसार, घटनेतील आरोपी युवकाने मागील ४ वर्षांपूर्वी स्थानिक परीसरातील एका महिलेवर अत्याचार करून खून केला होता. याप्रकरणी आरोपीने काही वर्ष कारावास देखील भोगला होता. तथापि, या घटनेत शिक्षा भोगून गत काही दिवसांपूर्वी कारागृहातून सुटलेल्या आरोपी युवकाने सकाळी अल्पवयीन बालकेला गावालगतच्या शेतशिवारात एकटी पाहून विनयभंग केला. घाबरलेल्या बालिकेने आरडाओरड केली असता शेकडो नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान आरोपीने पळ काढून घरात दडी मारली.

पोलीस उपनिरीक्षक अनिल मांदाडे, पोलीस हवालदार डोलीराम भोयर, पोलीस अंमलदार राहुल गायधने, भूपेंद्र बावनकुळे आदी पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून युवकाला ताब्यात घेतले. या घटनेत पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचल्याने संतापलेल्या नागरिकांच्या तावडीतून आरोपी बचावल्याने पुढील अनर्थ टळला. घटनेचा पुढील तपास ठाणेदार रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अरविंदकुमार जगणे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगbhandara-acभंडारा